Universities-Colleges Maharashtra | राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; उदय सामंत यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Universities-Colleges Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रान विषाणूने (Omicran Corona Variant) धुमाकूळ घातला आहे. दैनंदिन कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयाबाबत (Universities-Colleges Maharashtra) महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

 

मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातच मुंबईत तर कोरोनाने विस्फोट केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) काही निर्बंध (Restrictions) लागू केले आहे. तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी कडक निर्बंध करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. यानंतर आता महाविद्यालयां बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Universities-Colleges Maharashtra)

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –

– राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे.

– दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.

– ऑनलाईन (Online) परीक्षा होणार आहे.

– काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन (Online) परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी देण्यात यावी.

– प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश दिलेत.

– वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय.

– परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार.

– महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना.

– विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण (Vaccination) पूर्ण करून घेण्याचा सूचना

– 50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार

– वरील सर्व नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार आहेत.

 

Web Title :- Universities-Colleges Maharashtra | universities and colleges state will remain closed till february 15 says uday samant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

 

Pune Metro | पुणेकरांसाठी खूशखबर ! लवकरच ‘या’ मार्गावर मेट्रो धावणार

 

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत