Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Winter Diseases | हिवाळ्यात (Winter) अनेकांना अशी समस्या असते की त्यांचे हात पाय थंड (Cold) पडतात. हातमोजे-पायमोजे घातले, किंवा शाल आणि रजाईत हात ठेवले तरी सुद्धा ही समस्या जाणवते. ही गोष्ट लोकांना अगदी सामान्य वाटते. मात्र, त्यामागे शरीरातील आजार (Diseases) आणि कमतरता हे देखील कारण असू शकते. यासोबतच अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहता. (Winter Diseases)

 

हिवाळ्यात हातपाय थंड पडण्यामागे कोणती कारणे आसतात आणि यापासून आराम मिळवण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेवूयात.

 

1. हायपोथायरॉईडीझममुळे (Hypothyroidism)
घशात असलेल्या थायरॉईड ग्रंथीतून बाहेर पडणार्‍या थायरॉईड हार्मोनची अनियमितता किंवा अभाव यामुळेसुद्धा शरीरात रक्ताभिसरण मंद होऊ शकते. ज्यामुळे हात-पाय थंड पडतात. विशेष म्हणजे, थायरॉईड हार्मोन आपल्या चयापचय आणि हृदयाच्या ठोक्यांवर देखील परिणाम करतात. त्यामुळे त्याचे शरीरात कमी प्रमाणात उत्पादन झाल्यास रक्ताभिसरणही मंदावते, त्यामुळे हातपाय थंड पडतात.

 

2. मधुमेहामुळे (Diabetes)
मधुमेहाच्या औषधांमध्ये अशी काही रसायने असतात जी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी करतात. साहजिकच, यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि आपले हात-पाय थंड राहतात. याशिवाय डायबिटिजमध्ये मज्जासंस्थेचे नुकसान होण्याचीही शक्यता असते. ज्यांना ही समस्या आहे त्यांच्या हाताला आणि पायांना मुंग्या येणे आणि थंड पडण्याची समस्या होते. (Winter Diseases)

3. अ‍ॅनिमियामुळे (Anemia)
रक्तामध्ये लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी असतात. त्यांच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या उद्भवते. यासाठी आयर्न आणि फोलेटसोबतच व्हिटॅमिन-बी (12) ची कमतरता देखील कारणीभूत ठरू शकते. याशिवाय किडनी नीट काम करत नसेल तरी देखील रक्ताच्या कमतरतेचे कारण असू शकते. ज्यांना अ‍ॅनिमियाची समस्या आहे, त्यांचे हात पाय अनेकदा थंड पडतात. कारण लाल रक्तपेशीच आपले रक्तभिसरण व्यवस्थित ठेवतात.

 

4. मंद रक्ताभिसरणामुळे (Slow Blood Circulation)
जेव्हा रक्तप्रवाह मंदावतो तेव्हा नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता कमी होते. सतत सुस्त बसल्यानेही असे होते. यामुळे हात-पायही थंड पडतात. यासाठी रोज योगासने किंवा व्यायाम करत राहायला हवे. जेणेकरून रक्तदाब योग्य राहील आणि थंडी जाणवणार नाही. जेणेकरून हात आणि पाय थंड पडणार नाहीत.

 

5. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजमुळे (Blockage in Blood Vessels)
कोलेस्टेरॉल किंवा इतर कारणांमुळे जेव्हा आपल्या धमन्या बंद होतात तेव्हा आपल्या रक्ताचा वेग मंदावतो. अशा प्रकारे आपले रक्ताभिसरण बिघडते. त्यामुळे आपले हात पाय थंड पडतात आणि खूप प्रयत्न करूनही गरम होत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे हे घडते. म्हणूनच या समस्येपासून दूर राहिले पाहिजे.

 

या गोष्टींची घ्या काळजी
लोकरीचे किंवा उबदार शूज वापरा

नेहमी उबदार कपडे आणि हातमोजे आणि पायमोजे घाला.

दररोज व्यायाम आणि शारीरिक हालचाली करत रहा.

निकोटीनचा प्रभाव टाळा.

बैठे काम करताना, मध्येच उठून वेगाने चालावे जेणेकरून शरीरात उष्णता राहील.

 

 

Web Title :- Winter Diseases | know why hands and feet always cold in winter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Purandar Airport | पुणेकरांचे स्वप्नभंग? संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर विमानतळाचा ‘साइट क्लिअरन्स’ रद्द?

 

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1800 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या आकडेवारी

 

EPFO | ईपीएफ अकाऊंटमध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट, UAN द्वारे आहे शक्य, जाणून घ्या प्रक्रिया