Pune Metro | पुणेकरांसाठी खूशखबर ! लवकरच ‘या’ मार्गावर मेट्रो धावणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro | पुणेकरांसाठी आता वनाज-गरवारे महाविद्यालय (vanaz corner to garware college metro station) दरम्यान मेट्रो धावणार (Pune Metro) आहे. हा 5 किलोमीटरचा मार्ग अवघ्या 8 दिवसांमध्ये प्रवाशांसाठी (Passenger) सज्ज होणार असल्याची माहिती आहे. मेट्राेचे औपचारिक उद्‍घाटन झाल्यावर पुणेकरांसाठी मेट्रो धावणार आहे. मेट्राेचे काम पुर्ण झाले असून उर्वरीत कामे लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे. असं महामेट्रो प्रशासनाकडून (Mahametro Administration) सांगण्यात आलं आहे. एकदा मेट्रो सुरू झाल्यास वनाजपासून (vanaz) गरवारे महाविद्यालय पर्यंत (Garware College) पुणेकरांना अवघ्या 13 मिनिटांत हा प्रवास करता येणार आहे.

 

गरवारे महाविद्यालयाचे काम सुमारे 95 टक्के पूर्ण झाले असून 15 जानेवारी दरम्यान उर्वरीत स्थानकांची कामे पूर्ण होणार आहे. तसेच मेट्रो मार्गाच्या सुरक्षिततेची रेल्वेचे सुरक्षा आयुक्त 11 आणि 12 जानेवारी रोजी पाहणी करणार आहेत. त्यानंतर मेट्रोचे उद्‍घाटन झाल्यावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे, असं महामेट्रोचे कार्यकारी संचालक विनय अग्रवाल (Vinay Agarwal) आणि प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ (Atul Gadgil) यांनी सांगितलं. दरम्यान, मेट्रो मार्गाच्या उद्‍घाटनाचे नियोजन महापालिका, राज्य आणि केंद्र सरकार स्तरावर होत आहे. मेट्रो स्थानकात तळमजल्यावर बस बे आणि रिक्षा स्थानक, पहिल्या मजल्यावर तिकिट काऊंटर आणि कॅफेटेरीया दुसऱ्या मजल्यावर दोन प्लॅटफॉर्म असणार आहे. (Pune Metro)

मेट्रो स्थानकावर प्रवाशांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर, लिफ्ट शेजारील बटण दाबल्यावर थेट स्टेशन कंट्रोलरकडे कॉल जाणार आहे. तसेच, त्यांच्याकडून फोन उचलला न गेल्यास मेट्रोच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात कॉल जोडला जाणार आहे. यावरुन प्रवाशांची एखादी वस्तू मेट्रोत राहिली तर, हेल्पलाईनच्या माध्यमातून पुढील स्थानकावर मेट्रोचे कर्मचारी ती वस्तू ताब्यात घेऊन प्रवाशांना रिटर्न करता येणार आहे.

 

दरम्यान, नळस्टॉप स्थानकावर एका खासगी संस्थेने 45 लाख रुपयांचे जाहिरातीचे कंत्राट केले आहे.
तिकिटातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मेट्रोचा खर्च वसूल होत नसल्याचे उत्पन्नाच्या अन्य स्रोतातून उत्पन्न मिळविण्याचे महामेट्रोचे प्रयत्न सुरू आहेत.
स्थानकांवरही जाहिरातींसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे अतुल गाडगीळ (Atul Gadgil) यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मेट्रोच्या डब्यांवर जाहिरातीद्वारे एका वर्षासाठी 25 लाख रुपयांचे जाहिरातीचे कंत्राट एका राष्ट्रीयीकृत बॅंकेबरोबर निश्चित झालेय, तर, गरवारे महाविद्यालय स्थानकावर एका खासगी रुग्णालयाने 65 लाख रुपयांना 5 वर्षांच्या जाहिरातीचे कंत्राट निश्चित केले गेले आहे.

 

Web Title :-  Pune Metro | Good news for Punekars! Metro will run on this route soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Purandar Airport | पुणेकरांचे स्वप्नभंग? संरक्षण मंत्रालयाकडून पुरंदर विमानतळाचा ‘साइट क्लिअरन्स’ रद्द?

 

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

 

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1800 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या आकडेवारी