उन्नाव केस ! CBI चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना फाशी द्या, आरोपींच्या नातेवाईकांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बलात्कार पिडीतेला जाळल्यानंतर तरुणांच्या नातेवाईकांनी माध्यमांसमोर येऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुलांवर लावलेल्या आरोपांबाबत संशय व्यक्त करत नातेवाईकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

रविवारी पीडितेचा दफनविधी पार पडला यावेळी आरोपींच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, ज्यावेळी मुलीला जाळण्याची घटना घडली तेंव्हा हे तरुण आपल्या घरामध्येच झोपलेले होते. त्यानंतर पोलीस येऊन त्यांना उठवून नेले. तसेच मुलांना संशयावरून उचलण्यात आलेले आहे, तर अशा वेळी तपास उच्च स्तरावरून केला जावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

 unnao case updates

आपल्या एकुलत्या एक अपत्यासाठी रडत नातेवाईकांनी सांगितले की, जर तपासात ते दोषी आढळले तर न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. त्या ठिकाणी उपस्थित महिलांपैकी आणि पुरुषांपैकी अनेकांनी यावर भाष्य करणे टाळले.

Visit : Policenama.com