कलम 370 च्या मुद्द्यावर पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र परिषदेत ‘झटका’, शेवटची आशा देखील ‘मावळली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या मुद्दयावर पाकिस्तानला कोणत्याही देशाकडून समर्थन मिळत नसताना आता संयुक्त राष्ट्र परिषदेकडूनही जोरदार झटका मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अध्यक्ष देश पोलंडकडून हा झटका मिळाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. “नवी दिल्ली आणि ईस्लामाबादने काश्मीरचा मुद्दा द्वीपक्षीय स्तरावरच सोडवावा”, असे प्रतिपादन पोलंडने केले आहे. भारत आणि पाकिस्तानातील तणावपुर्ण संबंध पाहता पोलंडने ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र परिषदेत मांडण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना सध्या तरी यश मिळणार नसल्याचे दिसत आहे.

परिषदेचे अध्यक्षपद दर महिन्याला वेगवेगळ्या देशांकडे असते. ऑगस्ट महिन्यात ते पोलंडकडे आहे. त्याआधी रशियानेही या मुद्दयावर भारताला पाठिंबा देत समर्थन केले होते. भारताने जम्मू आणि काश्मीरला वेगळे करत केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा निर्णय संविधानाला अनुसरुनच घेतला आहे. या निर्णयाने भारत दोन्ही देशात तणाव वाढू देणार नाहीत. या शब्दात रशियाने प्रतिक्रिया दिल्या होत्या.

एका वृत्तपत्राला माहिती देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पोलंडचे विदेशमंत्री जोसेफ जापुतोविक्ज यांच्याशी फोनवरुन बोलणे झाले असल्याचे सांगितले. दोन्ही देशांनी त्यांचा विवाद शांततापुर्ण वातावरणात सोडवावा. आम्हीही या चर्चेत युरोपीय युनियनप्रमाणे पक्षकार असू. दोन्ही देश द्विपक्षीय स्तरावर तोडगा काढतील. द्वीपक्षीय या शब्दावर जोर देत ते म्हणाले की, दोन्ही देशात कोणत्याही तणावपुर्ण घटनेला रोखण्यासाठी ते प्रयत्न करतील.” या शब्दात जापुतोविक्ज यांनी पोलंडचाही भारताला पाठिंबा दिल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले.

जापुतोविक्ज यांच्या म्हणण्यानुसार एस. जयशंकर म्हणाले की त्यांनीही कलम ३७० च्या बाबतील केलेले बदल हे संविधानाला अनुसरुन केले असून ताे देशाचा अंतर्गत मुद्दा आहे. याचा उद्देश फक्त काश्मीर मधील दहशतवादी कारवाया रोखणे आणि तिथे नव्या संधी उपलब्ध करुन देणे हा आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like