UP Assembly Election 2022 | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना डच्चू देणार? चर्चांना उधाण

लखनऊ : वृत्तसंस्था – सर्वाधिक खासदार निवडून देणारा प्रदेश अशी उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) ओळख तर आहे. याशिवाय देशातील सर्वात मोठं राज्य (Big state) देखील आहे. येथील निवडणूक (Election) पुढील लोकसभेची सेमी फायनल (Lok Sabha semi-final) मानली जात आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका (UP Assembly Election 2022) होत आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानं (BJP) आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार ? योगी आदित्यनाथांना (yogi adityanath) कायम ठेवणार की नवा चेहरा दिला जाणार ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांना पुढील निवडणुकीत (Election) भाजपचा (BJP) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. परंतु मौर्य यांनी याबद्दल स्पष्ट उत्तर देणं टाळलं. मौर्य यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा (second time CM) उमेदवार कोण याविषयी थेट भाष्य करण टाळलं आहे.

पक्षाचं नेतृत्व मुख्यमंत्री ठरवतं


विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपचा (BJP) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं नाव स्पष्टपणे घेतलं नाही. ‘सध्या योगी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण असणार, अध्यक्ष कोण होणार हे पक्षाचं नेतृत्व (Party leadership) ठरवतं. आतापर्यंत सगळे निर्णय (decision) केंद्रानं घेतले आहेत. यापुढेही त्यांच्याकडूनच निर्णय घेतले जातील. निवडणूक होईल, निकाल येईल, बैठक होईल. त्यात मुख्यमंत्री ठरेल,’ असं मौर्य यांनी सांगितलं.

त्यावर केंद्र निर्णय घेईल 

सध्या देशात आसाम मॉडेलची (Assam model) चर्चा आहे.
आसाममध्ये भाजपनं (BJP) सत्ता राखल्यानंतर आधीच्या मुख्यमंत्र्यांना हटवून त्यांच्या जागी हिमंत बिस्व सरमा (Himant Biswa Sarma) यांना संधी देण्यात आली.
उत्तर प्रदेशातही असंच होणार का, असा प्रश्न मोर्य यांना विचारण्यात आला.
त्यावर केंद्र निर्णय घेईल, असं उत्तर त्यांनी दिलं.

 

Wab Title :- UP Assembly Election 2022 | yogi adityanath may cm candidate assembly election 2022 deputy cm keshav maurya answers

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये

DSK Builder Case | 32 हजार ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक ! बिल्डर डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णींचा जामीनासाठी अर्ज