UP बार काऊन्सीलच्या अध्यक्षाचा गोळ्या घालून खून

आगरा (यूपी) : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात बार काऊन्सिल अध्यक्ष दरवेश सिंह यांचा त्यांच्याच सहकारी वकिलाने गोळ्या घालून खून केला. खून केल्यानंतर मारेक-याने स्वत:वर गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला दरवेश सिंह यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये गंभीर जखमी होऊन सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरवेश सिंह या यूपीच्या पहिल्या महिला बार काउन्सील अध्यक्ष होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवेश सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा स्वागत समारंभ दिवणी न्यायालयाच्य परिसरात ठेण्यात आला होता. स्वागत समारंभ सुरु असताना अ‍ॅड. मनीष शर्मा याने दरवेश सिंह यांच्यावर एका पाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी मनिष शर्मा याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोन दिवसांपूर्वीच दरवेश सिंह यांची यूपी बार काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. दरवेश सिंह यांनी २००४ मध्ये दिवाणी न्यायालयात प्रॅक्टीस सुरु केली होती. २०१७ मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. २०१९ मध्ये झालेल्या एका निवडणुकीत सिंह आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला समान मते पडली होती. त्यामुळे दोघांना सहा-सहा महिन्यांसाठी अध्यक्ष पद देण्यात आले होते.
आरोग्यविषयक वृत्त

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही

Loading...
You might also like