योगी अदित्यनाथांनी प्रचारादरम्यान TikTok स्टार सोनाली फोगाटचं आदमपूरशी जोडलं नातं, सांगितली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ शनिवारी हरियाणाच्या प्रचार दौऱ्यावर होते. हिसार मध्ये आदमपूर विधानसभा मतदारसंघासाठी टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्यासाठी प्रचार करत आहेत. त्याचवेळी त्यांनी सोनाली फोगाट यांचे मोठा किताब देत आदमपूरशी नाते जोडून मतदारांना मतदान करण्याचा आव्हान दिले.

दाखवून देऊ आदमपूरचा विकास –
मुख्यमंत्री योगी यांना आदमपूरमध्ये सांगितले की भाजप उमेदवार सोनाली फोगाट हरियाणाची ओळख आहे. आमदपूर त्यांचे आजोळ आहे, आणि भाचीचा देखील आजोळावर हक्क असतो. त्यामुळे त्यांना निवडून द्या. योगी म्हणाले की तुम्ही 50 वर्षा पुरुषाला पाहिले आहे, यंदा मतदान करुन वीरांगानेला संधी द्या. मग दाखवून देऊ आदमपूरचा विकास.

योगी म्हणाले की 2014 पूर्वी हरियाणाचे नाव भ्रूण हत्त्येसाठी ओळखले जात होते. हरियाणामध्ये मुलींची संख्या कमी झाली होती, परंतू पंतप्रधान मोदींना हरियाणा बेटी बचाओ, बेटी पढाओ साठी प्रयत्न केले आणि आता परिणाम समोर आहे. मनोहर खट्टर सरकारने अभियान सफल बनवले, आज हरियाणाच्या मुली पुढे जात आहेत.

कुलदीप विश्नोई यांच्या विरोधात सोनाली फोगट –
आदमपूरमध्ये काँग्रेसचे तीन वेळा आमदार असलेले कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात टिक टॉक स्टार सोनाली फोगट यांना भाजपने संधी दिली आहे. फोगाट यांचे टिकटॉकवर 1.20 लाख फॉलोवर आहेत, त्यांनी आता पर्यंत 175 व्हिडिओ बनवले आहेत, विशेषता तरुण मतदारांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.

Visit : Policenama.com