मेव्हण्याकडून स्वत:वर गोळी झाडून घेणार्‍या भाजप खासदाराचा मुलगा फरार ! ; लखनौ पोलिस घेताहेत शोध

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   उत्तर प्रदेश राज्यातील मोहनलालगंजमधील भाजप खासदार कौशल किशोर यांच्या मुलावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एक व्टिस्ट समोर आला आहे. मेव्हण्याकडून स्वत:वर गोळी झाडून घेणारा भाजप खासदाराचा तो मुलगा रूग्णालयातून फरार झाला आहे. त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता त्याचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी खासदाराच्या त्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली आहे.

भाजप खासदार कौशल किशोर यांच्या मुलाने सकाळी पोलिसांना खबर देऊन कळवले की, अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करून पळून गेले आहेत. गोळी अशावेळी मारण्यात आली तेव्हा भाजप खासदाराचा मुलगा मेव्हण्यासोबत होते. खासदाराच्या मुला संबंधित गोळीबार झाल्याच्या प्रकरणामुळे पोलिसांमध्ये खळबळ माजली होती. त्यांनी तातडीने तपास सुरू केला.

मात्र, या तपासावेळी पोलिसांना असा संशय आला की, या गोळीबार प्रकरणाच्या पाठिमागे खासदारांचा मुलगा तर सामील नाही ना? याची सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मेहुण्याला पोलिस कोठडी घेतले तसेच त्याच्याकडे चौकशी केली. यावेळी मेहुण्याने सर्व रहस्ये उघडली. मेहुण्यानुसार, खासदार मुलाच्या सांगण्यावरून त्याने गोळीबार केला, कारण खासदार मुलाला कुणाला तरी गुंतवायचे होते. पोलिसांनी ही पिस्तूलही जप्त केली.

तर इकडे, मेहुण्याच्या अटकेची बातमी समजताच खासदारांचा तो मुलगा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयातूनच गायब झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी माडियांव पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याची तयारी सुरू आहे. त्यासोबत खासदार यांचा मुलगा आणि मेव्हणा यांना तुरुंगात पाठविण्याची तयारीही सुरू केली आहे.

याप्रकरणी भाजप खासदार कौशल किशोर म्हणाले की, माझ्या मुलाने मला जे सांगितले आहे त्यानुसार सकाळी काही हल्लेखोर त्याच्यावर गोळीबार करत आहेत. आता, जर त्याचा मेव्हणा स्वत: गोळीबाराची कबुली देत असेल तर ते चुकीचं आहे, मीसुद्धा त्याच्याबरोबर माझा मुलगा मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे, मला या घटनेची माहिती नाही, कोणाशीही माझा कौटुंबिक वाद नाही.

भाजप खासदार कौशल किशोर म्हणाले, ’मी अद्याप कोणतीही पुष्टी दिली नाही, पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करावा आणि कोणी निष्पाप व्यक्तीला अडकवू नये, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मुलाने षडयंत्र रचून स्वत: वर गोळीबार केला असेल तर त्याने चूक केली आहे. तो माझ्याबरोबर राहत नाही. कधीकधी मी घरी भेटायला येत असतो.

भाजप खासदार कौशल किशोर यांच्या मुलाने गोळीबार प्रकरण का घडवून आणले आहे? त्याचा काय उद्देश होता?, यात कोणाला तो फसवणार होता? यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून घेणार असल्याचं समजत आहे.