अयोध्येत बांधल्या जाणार्‍या मशिदीचं नाव मोहम्मद साहेब यांच्यावरील असावं, योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याची सूचना

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील अल्पसंख्यांक कार्यमंत्री मोहसीन रझा यांनी केंद्रीय सुन्नी वक्फ बोर्डाला सुचना केली आहे की, अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या मशिदीचे नाव ठेवायचे झाल्यास त्याचे नाव मोहम्मद साहेब ठेवले पाहिजे आणि त्यास “मशिद ए मोहम्मदी” असे नाव देण्यात यावे. मोहसीन रझा म्हणाले की, बाबरच्या नावाने या देशात काहीही स्वीकारले जाणार नाही. मग ती मशिद असो की अन्य काही, कारण बाबरने काही चांगले केले नाही. बाबरच्या नावावर सर्व मुस्लिमांचे एकमत होणार नाहीत आणि आम्ही ते स्वीकारणार नाही.

मोहसीन रझा म्हणाले, ज्याप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम राम पुरुषांमध्ये उत्कृष्ट आहेत, त्याचप्रमाणे पैगंबर मोहम्मद साहब मुस्लिमांमध्ये महापुरुष आहेत आणि हिंदूंमध्येही त्यांचा आदर तितकाच आहे. म्हणूनच या मशिदीचे नांव ठेवायचे असेल तर त्याचे नाव “मस्जिद-ए-मोहम्मदी” असावे, ही सुन्नी मंडळाला माझी सूचना आहे.

मोहसीन रझा म्हणाले, “राहिली गोष्ट योगी जींना तेथील कार्यक्रमात सहभागी होण्याची तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मशिदी बांधण्याची परवानगी मिळाली आहे, तर तिथे मशिदी बांधली जाईल आणि जेव्हा जेव्हा कोणालाही चांगल्या कामासाठी बोलावले जाईल, मग मला बोलावले किंवा भाजपामध्ये कोणत्याही मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला, सर्व लोक जातील. आम्ही चांगल्या कार्यासाठी सर्वत्र जातो.