धक्कादायक ! 4 जणांची निर्घृण हत्या करणारा वेश बदलून बनला पुजारी, 40 वर्षांनी पोलिसांनी ठोकल्या ‘बेड्या’

लखनौ : वृत्तसंस्था – चार जणांचा निर्घृण खून करुन फरार झालेल्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) पथकाने 40 वर्षानंतर बेड्या ठोकल्या (Accused Arrested after 40 Years) आहेत. आरोपी एका मंदिरामध्ये वेश बदलून पुजारी (Priest) म्हणून वावरत होता. आरोपी यतेंद्रला 40 वर्षांपूर्वी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. ही घटना मैनपुरीच्या नगला तारा गावात 1978 मध्ये घडली होती. या हत्याकांडानंतर पोलिसांनी येतेंद्रला अटक करुन जेलमध्ये पाठवलं होतं. 1981 पासून फरार झालेल्या आरोपीच्या युपी पोलिसांनी (UP Police) अखेर मुसक्या आवळल्या आहेत.

या गुन्ह्यामध्ये आरोपी यतेंद्रला 1981 मध्ये हायकोर्टाने (High Court) अटी शर्तीवर जामीन (Bail) मंजूर केला होता. जामीन मिळताच यतेंद्र (Yatendra) फरार झाला. यानंतर त्याने आपली ओळख लपवण्यासाठी वेशांतर केले. वेशांतर करुन तो एका मंदिरात पुजारी म्हणून वावरत होता. 40 वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या यतेंद्रवर पोलिसांनी दहा हजारांचे बक्षीस ठेवले होते. पोलीस त्याच्या मागावर होते परंतु तो सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पुन्हा अटक केली आहे.

UP Police | after 40 years police arrested who killed 4 people changed his disguise and became priest

काय आहे प्रकरण ?

जमिनीच्या वादातून मैनपुरी येथे 5 जून 1978 मध्ये मैनीपुर येथील नंगला तारा गावात चार जणांची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. मदन सिंह, महेंद्र सिंह, सरमन आणि ललित यांच्यावर आरोपी यतेंद्र आणि त्याच्या 5 साथीदारांनी गोळ्या मारुन सामुहिक हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी सहापैकी पाच आरोपींना अटक केली होती. तर कोर्टाने एकाची निर्दोष सुटका केली होती.

आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा

1981 मध्ये जनपद न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवून आजीवन कारावासाची (Life imprisonment) शिक्षा सुनावली. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णया विरुद्ध आरोपींनी हायकोर्टात अपील केले होते. त्यावेळी हायकोर्टाने 5 जणांना जामीन दिला. त्यानंतर पीडित सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचले. न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले. यानंतर 5 आरोपीपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींचा फतेहगड कारागृहात मृत्यू झाला. तर तिन आरोपी रामकृपाल, यतेंद्र आणि गजेंद्र हे 1981 पासून बेपत्ता झाले.

कामाख्या मंदिरात पुजारी

न्यायालयाने पोलिसांना वारंवार आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले. परंतु आरोपी सापडत
नसल्याने त्यांच्यावर बक्षीस ठेवले. दरम्यान, खबऱ्याकडून पोलिसांना यतेंद्र हा पुजारी बनून स्थानिक
मंदिरात राहत असल्याची माहिती मिळाली. तर त्याची पत्नी आणि मुलगा लखनौ येथे रहात
असल्याचे समजले. तसेच यतेंद्र हा आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी अधूनमधुन जात होता. यतेंद्र
कामख्या मंदिरात पुजारी म्हणून नाव बदलून राहत होता. पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही.
पोलीस आता दोन आरोपींचा शोध घेत आहेत.

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | 40 हजाराची लाच घेताना तरुण अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Bombay High Court | बदल्यांमध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप नकोच, कठोर नियमनाची गरज – हायकोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  UP Police | after 40 years police arrested who killed 4 people changed his disguise and became priest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update