केजरीवाल सरकारचं दिल्‍लीकरांना ‘मोठं’ गिफ्ट, 200 युनिटपर्यंत वीज ‘एकदम’ फ्री

नवी दिल्ली : वृत्‍तसंस्था – दिल्‍लीच्या अरविंद केजरीवाल सरकारनं दिल्‍लीकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्‍लीत 200 युनिटपर्यंत वीज एकदम फ्री देण्याची घोषणा केली आहे. यापुर्वी देखील केजरीवाल यांनी दिल्‍लीत महिलांना मोफत प्रवास केला होता. त्यानंतर त्यांनी आज (गुरूवार) ही घोषणा केली आहे.

दिल्‍लीमध्ये सध्या वीजेच्या 200 युनिटसाठी 622 रूपये द्यावे लागतात. आता 200 युनिटची वीज एकदम फ्री मिळणार आहे तर यापुर्वी 250 युनिटसाठी 800 रूपये बील भरावं लागत होतं आता 250 युनिट वीज केवळ 252 रूपयांमध्ये मिळणार आहे. 300 युनिटसाठी पुर्वी 971 रूपये मोजावे लागत होते आता केवळ 526 रूपयाचं बील भरावं लागणार आहे तर पुर्वी 400 युनिटसाठी 1320 रूपयाचं बील येत होत आता केवळ 1085 रूपयांमध्ये वीजेचे 400 युनिट मिळणार आहेत. अरविंद केजरीवालांच्या या घोषणेमुळं दिल्‍लीकर आनंदित झाले आहेत. जवळपास दिल्‍ली सरकारनं वीजेच्या 201 ते 400 युनिटवर 50 टक्के सबसिडीची घोषणा केली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –