काळजी करू नका ! आता पॅनकार्डशिवाय देखील करता येणार ‘ही’ महत्वाची १८ कामे, जाणून घ्या

आयकर विभाग देणार आपल्याला पॅन नंबर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता आपण पॅन कार्ड शिवाय क्रेडिट आणि डेबिट कार्डे देखील बनवू शकता. आपण कार खरेदी विक्री हि करू शकल. या कामांसाठी आतापर्यंत पॅन कार्ड असणे अनिवार्य होते. परंतु ५ जुलै रोजी संसदेत मांडलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पानंतर पॅन १८ प्रकारच्या आर्थिक सेवांसाठी अनिवार्य असणार नाही. पॅन ऐवजी आता आपण आपला आधार नंबर वापरू शकता. पण हे त्याच व्यक्ती करू शकतात ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल. तुमच्याकडे पॅन कार्ड असल्यास अशा परिस्थितीत आपल्याला १८ प्रकारच्या आर्थिक सेवांसाठी आपल्या पॅनकार्डची माहिती देणे अनिवार्य असेल.

प्रत्यक्षात ५ जुलै रोजी, अर्थसंकल्पात असे म्हटले गेले होते की आयकर परतावा भरण्यासाठी एखादी व्यक्ती पॅन कार्ड ऐवजी त्याचा आधार कार्ड वापरू शकतो. पण आयकर खात्यानुसार, पॅन कार्ड नंबर आवश्यक असलेल्या ठिकाणीच आधार नंबर वापरू शकतो. आधार क्रमांका सोबतच, आयकर खात्याच्या वतीने त्या व्यक्तीस पॅन कार्ड क्रमांक देण्यात येईल. अशा बाबतीत जर आपल्याकडे पॅनकार्ड नसेल आणि आपल्याला पॅन बनवायचा असेल तर आपण आधार क्रमांकास कोणत्याही आर्थिक सेवांवर १८ प्रकार लागू केल्यास,तुम्हाला आपोआप पॅन नंबर मिळेल. आता देशात १२० कोटींच्या जवळपास आधार नंबर आहेत. यावर्षी ३१ मार्चपर्यंत ४४.५७ कोटी लोकांना पॅन कार्ड देण्यात आले होते. या पैकी २५ कोटी लोकांनी त्यांच्या पॅनला आधार सोबत जोडले आहे.

सरकारी नियमांनुसार, या १८ कामांसाठी पॅन नंबर अनिवार्य आहे

१. कोणतीही मोटर कार खरेदी आणि विक्रीसाठी

२. बँक खाते उघडण्यासाठी (जन धन ला वगळता)

३. डेबिट क्रेडिट कार्ड जारी करणे

४. डीमॅट खाते उघडण्यासाठी

५. एका हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये कॅशमध्ये एका वेळी ५0,000 बिले भरणे

६. ५0,000 रुपयांपेक्षा जास्त परदेशी चलन खरेदीसाठी

७. ५0,000 रुपयांपेक्षा अधिक म्युच्युअल फंड खरेदी केल्यावर

८. ५0,000 रुपयांपेक्षा जास्त रोखे खरेदी करण्यावर

९. बँकेमध्ये रु. ५0,000 पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यावर

१०. आरबीआय कडून जारी केलेल्या ५0,000 हून अधिक रोखे खरेदी केल्यावर

११. एका दिवसात ५0,000 पेक्षा जास्त बँक ड्राफ्ट तयार करणे

१२. एक आर्थिक वर्षात बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट खात्यामध्ये ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास

१३. ५0,000 रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर लाइफ इन्शुरन्स प्रीमियम कॅश भरताना

१४. ५0,000 हून अधिक पे ऑर्डर बनवण्यासाठी

१५. सिक्युरिटीजच्या खरेदी विक्रीवर जर एक लाख रुपये प्रति व्यवहार असल्यास

१६. एका मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजपेक्षा वेगळ्या ठीकाणी कंपनीचा एक लाख रुपयांवरील शेअर्सवर

१७. १0 लाख रुपयांपेक्षा अधिकची स्थावर मालमत्ता खरेदी आणि विक्री करणे आणि मुद्रांक खरेदी करणे

१८. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची वस्तू खरेदी केल्यावर

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच