SBI सेव्हिंग अकाऊंट : अपडेट करा ‘ही’ माहिती अन्यथा पैसे काढण्यास येतील अडचणी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी बदललेला असेल तर तुम्ही या दोन प्रकारची माहिती आपल्या बँक खात्यात नक्की अपडेट करायला पाहिजे. याबाबतचे एक अपील देखील एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना केले आहे. यामुळे तुम्हाला केवळ बँक खात्याचीच नाही तर संपूर्ण व्यवहारांची माहिती देखील सतत मिळत राहील. एवढेच नाही तर एखाद्या फ्रॉड पासून वाचायला देखील याची मदत होईल. कारण मोबाइल क्रमांकावर सर्व प्रकारची माहिती क्षणात उपलब्ध होत असते.

जर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा मोबाइल नंबर अपडेट नाही तर तुम्ही साय 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत दहा हजारांपेक्षा अधिकचा व्यवहार करू शकत नाहीत. नुकतीच एसबीआयने यावेळी 10 हजाराहून अधिक रुपये काढण्यासाठी ओटीपी आधारित विड्रॉल सिस्टीम यंत्रणा लागू केली आहे. एसबीआयने गेल्या आठवड्यात एक ट्विट केले होते आणि ग्राहकांना बँक रेकॉर्डमध्ये त्यांचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी जोडण्यास सांगितले होते. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती.

सर्वात आधी तुम्हाला एसबीआय इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगिन करावे लागेल.
त्यानंतर ‘My Accounts & Profile’ सेक्शनमध्ये जा
नंतर ‘Profile’च्या पर्यायावर क्लिक करा, यामध्ये ‘Personal Details/Mobile’ ची निवड करा.
क्विक कॉन्टैक्टवर क्लिक करा आणि त्यानंतर एडिटचा पर्याय निवडा.
या ठिकाणी तुम्ही तुमचा नवीन मोबाईल क्रमांक आणि इमेल आयडी टाका.
त्यानंतर आलेला ओटीपी खालील रिक्त जागेत भरा.
रिक्त स्थानावर ओटीपी भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.

मोबाईल अँप द्वारे देखील करू शकता अपडेट
तुम्ही अँपच्या माध्यमातून देखील आपला मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी बदलू शकता. यामध्ये लॉगिन करून मेन्यू मध्ये जाऊन ‘My Profile’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एडिट पर्याय निवडा आणि त्या ठिकाणी मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी टाका. त्यानंतर ओटीपी जनरेट करून तो टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

बँकेच्या ब्रांचमधून देखील करू शकता अपडेट
आपल्या बँक खात्यातील इमेल आयडी आणि मोबाइल नंबर बदलण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील एसबीआय बँकेत देखील जाऊ शकता. परंतु यासाठी बँकेत गेल्यावर तुम्हाला तुमचे ओळखपत्र दाखवावे लागेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/