UPI वरील आर्थिक व्यवहारांनी 2 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – ऑक्टोबर २०२० मध्ये यूनिफाईड पेमेंट्स इरफेस (यूपीआय ) वरील आर्थिक व्यवहारांनी २ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. मागील वर्षांपासून यूपीआयवरील व्यवहारात ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये यूपीआयवर १. १४ अब्ज व्यवहार झाले होते अशी माहिती, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी दिली. याकाळात व्यवहाराचे मूल्य वाढून दुप्पट झाले आहे असेही त्यांनी सांगितले.

कांत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, यूपीआयवर गेल्या महिन्यात २.७ अब्ज व्यवहार झाले आहे. व्यवहारातील मूल्य १०१ टक्क्यांनी वाढून १,९१,३५९.९४कोटी रुपयांवरून ३,८६,१०६. ७४ कोटी झाले आहे.

कोरोनामुळे लोकांनी डिजिटल पेमेंटचा वापर केल्यामुळे यूपीआयला फायदा झाला आहे. सणासूदीमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.