UPSC Capf २०१९ चे परिक्षा ‘प्रवेश पत्र’ जारी, ही आहे ‘डाऊनलोड’ करण्याची ‘प्रक्रिया’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय आर्म्ड पोलीस फोर्सेस (असिस्टेंट कमांडेट) सीएपीएफ परिक्षेचे ई एडमिट कार्ड (हॉलतिकिट) जारी करण्यात आले आहे. यूपीएससीच्या सीएपीएफ परिक्षेच्या एडमिट कार्ड आधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आले आहे. सीएपीएफची परिक्षा १८ ऑगस्टला आयोजित करण्यात आले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकमधून अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात.

असे डाऊनलोड करा प्रवेश पत्र
१. सर्वात आधी यूपीएससीच्या आधिकृत वेबसाईटवर जा.
२. यानंतर ई अ‍ॅडमिट कार्डच्या संबंधित लिंकवर क्लिक करा.
३. तुमची महत्वपूर्ण माहिती भरा आणि सबमिट करा.
४. अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यात संभाळून ठेवा.

अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर उमेदवाराने एकदा ते व्यवस्थित पडताळूण घ्या. जर प्रवेश पत्रावर फोटो क्लीअर नसेल तर परिक्षेच्या ठिकाणी दोन फोटो घेऊन जा, याशिवाय आयडी कार्ड सोबत नेणे अनिवार्य आहे.

upsc ने या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांचे प्रवेश पत्र लवकरात लवकर डाऊनलोड करुन घ्यावे, परिक्षेला येताना प्रवेश पत्र, आयडीकार्ड असणे आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –