Urfi Javed | ‘कोणाची शाॅल ओढली आहे?’, उर्फीच्या नवीन स्टाईलवर चाहत्यांचे प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Urfi Javed | Bigg Boss फेम उर्फी जावेद (Urfi Javed) अलिकडे तिच्या कपड्यांमुळे वारंवार ट्रोल होत असते. या ट्रोलिंगचा (Trolling) तिला काही फरक पडत नसला तरी युझर्स तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतच उर्फीला स्पाॅट करण्यात आलं आहे.

 

यादरम्यान, उर्फीने न्यूड रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस एखादी शाॅल गुंडळ्या सारखी असल्यामुळे कोणाची शाॅल गुंडाळून फिरत आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या ड्रेसमध्ये उर्फी जावेदने (Urfi Javed) तिचं क्लिवेज आणि पोट फ्लाॅन्ट केलं आहे. त्यामुळे अतिशय बोल्ड अंदाजात ती पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे.

 

काही दिवसांपुर्वी उर्फीने चंदेरी फाॅईलचा (Silver Foil) ड्रेस बनवून तो परिधान केला होता. ‘मेट गाला’ (Met Gala) कार्यक्रमात पाॅप स्टार रिहानाने (Pop Star Rihana) काही वर्षांपुर्वी तसाच ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे उर्फीला ट्रोल करत अनेकांनी तिला स्वस्तातली रिहाना तर काहींना तिला स्वस्तातील मेट गाला असं म्हटलं होतं. उर्फीने अनेक बोल्ड माॅडेल्सना काॅपी केलं आहे. ज्यामध्ये केंडल जेनर तसेच बेला हदीद यांचा देखील समावेश आहे.

 

Web Title :- Urfi Javed | urfi javed trolled by fans for wearing brown cut out dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा