Uric Acid | यूरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी चुकूनही करू नये दह्याचे सेवन, जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) जास्त असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची (Diet) विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण (Uric Acid Level) वाढल्याने संधिरोगासह (Rheumatic Diseases) अनेक रोग होण्याचा धोका असतो. युरिक अ‍ॅसिडचे (Uric Acid) प्रमाण वाढल्याने रुग्णांच्या हात-पाय आखडतात आणि असहय्य वेदना होतात.

 

अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचे सेवन केल्याने शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे सांधेदुखी आणि सूज (Swelling) येऊ शकते. यूरिक अ‍ॅसिड (Uric Acid) वाढल्यावर रुग्णांनी दही (Curd) खावे की नाही, आणि अशा स्थितीत कोणते पदार्थ टाळावे हे जाणून घेऊया.

 

दह्याचे सेवन टाळा (Avoid Curd) :
दुपारच्या जेवणानंतर दही खायला बहुतेक लोकांना आवडते. पण अशा लोकांनी दही अजिबात खाऊ नये, ज्यांचे यूरिक अ‍ॅसिड वाढले आहे, खरे तर दह्यामध्ये भरपूर प्रोटीन (Protein) असते जे यूरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांसाठी हानिकारक असते. दह्यामध्ये असलेले ट्रान्स फॅट (Trans Fat) यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढवण्याचे काम करते.

 

आईस्क्रीम आणि फास्ट फूड (Ice Cream And Fast Food) :
उन्हाळा सुरू होत आहे, अशा स्थितीत लोक फास्ट फूड (Fast Food) आणि आईस्क्रीमचे (Ice Cream) सेवन करतात. पण सहसा हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी फायदेशीर नाहीत. युरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांसाठी ते आणखी हानिकारक आहे. त्यामुळे ते टाळावे.

या गोष्टींचे सेवन टाळा (Avoid These Things) :

प्युरीन युक्त भाज्यांचे सेवन टाळावे (Avoid Purine Rich Vegetables).

नॉनव्हेज (Non-veg), सीफूड (Seafood), अल्कोहोल (Alcohol) यासारख्या पदार्थांचे सेवनही करू नये.

व्हिनेगर (Vinegar), ताक (Buttermilk), सोया दूध (Soya Milk), मटार (Peas), पालक (Spinach), ब्रसेल्स स्प्राउट्स (Brussels Sprouts) इत्यादींचे सेवन बंद करा.

 

युरिक अ‍ॅसिड वाढल्याने होणारे नुकसान (Hyperuricemia)

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येणे

मूत्रपिंड निकामी होणे (Kidney Failure)

अनेक अवयव निकामी होण्याचा धोकाही (Risk of Organ Failure) वाढतो.

 

जेव्हा किडनी वाढलेले अ‍ॅसिड फिल्टर करू शकत नाहीत तेव्हा शरीरात यूरिक अ‍ॅसिड तयार होते, त्यामुळे ते हाडांच्या सांध्यामध्ये (Bone Joints) क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते.

 

यूरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते, अशा स्थितीत अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे शरीरात यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे व्यक्तीला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Uric Acid | uric acid curd should not be consumed even by forgetting uric acid patients know why

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Magic Drink | वजन कमी करण्यासाठी प्या ‘हे’ मॅजिक ड्रिंक आणि मिळवा अनेक आरोग्य लाभ, जाणून घ्या ‘ते’ कसे बनवतात?

 

Phone Tapping Case | ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात रश्मी शुक्लांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ आदेश

 

World Obesity Day | वजन कमी करायचे आहे तर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, खाल्ल्यास वाढू शकतो लठ्ठपणा