US Federal Reserve – Indian Stock Market | अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयासह कोणते फॅक्टर्स ठरवतील बाजाराची दिशा, जाणून घ्या मार्केट ट्रेंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – US Federal Reserve – Indian Stock Market | शेअर बाजाराची (Stock Market) वाटचाल या आठवड्यात (This Week) व्याजदरावर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) कोणता निर्णय घेते त्यावर ठरणार आहे. विश्लेषकांनी हे मत व्यक्त केले आहे. याशिवाय शेअर बाजारात परकीय भांडवलाची (Foreign Capital) आवक आणि कच्च्या तेलाचा (Crude Oil) कल यांचाही प्रमुख शेअर निर्देशांकांवर परिणाम होईल. (US Federal Reserve – Indian Stock Market)

 

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे संशोधन प्रमुख संतोष मीणा (Santosh Meena, Head of Research, Swastika Investmart Limited) म्हणाले, अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीनंतर जागतिक बाजार चिंताग्रस्त दिसत आहेत. त्यामुळे डॉलरचा निर्देशांक 110 च्या आसपास पोहोचला आहे. यूएस फेडरल फ्री मार्केट कमिटी (एफओएमसी) च्या आगामी बैठकीच्या निकालाकडे आता व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. मीना म्हणाले की, बँक ऑफ इंग्लंडही व्याजदराचा निर्णय जाहीर करेल. (US Federal Reserve – Indian Stock Market)

 

परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका महत्त्वाची
ते पुढे म्हणाले की, संस्थात्मक गुंतवणूकदार महत्त्वाची भूमिका बजावतील, कारण परदेशी गुंतवणूकदार भारतीय इक्विटी मार्केटमध्ये विक्रेते झाले आहेत. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन उपाध्यक्ष अजित मिश्रा (Ajit Mishra, Research Vice President, Religare Broking Ltd) म्हणाले, कोणताही प्रमुख देशांतर्गत डेटा आणि घटनांच्या अभावात, सहभागींची नजर यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे असेल. याशिवाय परदेशी आवकवर सुद्धा लक्ष असेल.

सध्या घसरणीचा कल
गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 952.35 अंक किंवा 1.59 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी 302.50 अंक किंवा 1.69 टक्क्यांनी घसरला.
शुक्रवारी सेन्सेक्स 1,093.22 अंकांनी किंवा 1.82 टक्क्यांनी घसरून 58,840.79 वर बंद झाला.
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर (Vinod Nair, Head of Research, Geojit Financial Services) म्हणाले की, भक्कम व्यापक आर्थिक डेटा असूनही, देशांतर्गत बाजारात बाँड उत्पन्न आणि आणि डॉलर निर्देशांकाच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे शेअर मार्केटमध्ये घसरण झाली.

 

गेल्या आठवड्यात 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2,00,280.75 कोटी रुपयांची घसरण झाली.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस (Infosys) चे सर्वाधिक नुकसान झाले.
मागील आठवड्यात सेन्सेक्स 952.35 अंकांनी म्हणजेच 1.59 टक्क्यांनी घसरला होता.
या काळात Reliance Industries, TCS, HDFC Bank, Hindustan Unilever, Infosys आणि HDFC यांचे बाजार भांडवल घसरले.
दुसरीकडे, ICICI Bank, State Bank of India, Adani Transmission आणि Bajaj Finance चे शेअर्स वधारले.

 

Web Title :- US Federal Reserve – Indian Stock Market | with the decision of the us federal reserve which factors will decide the movement of the market

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

आता घरबसल्या पेन्शनर्स जमा करू शकतात Digital Life Certificate, EPFO ने लाँच केले अ‍ॅप, जाणून घ्या प्रक्रिया

30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा Demat Account संबंधित हे महत्वाचे काम, अन्यथा करू शकणार नाही शेअरची खरेदी-विक्री

MP Vinayak Raut | एकनाथ शिंदेवर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले…