MP Vinayak Raut | एकनाथ शिंदेवर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या आमदार (Shivsena Rebel MLA) आणि खासदारांवर (MP) शिवसेना नेते टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) असोत किंवा कोणताही बंडखोर आमदार किंवा खासदार असो त्यांच्यावर शिवसेना नेते जहरी टीका करताना दिसत आहेत. दरम्यान कोकणातील खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी तर थेट एकनाथ शिंदे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केले आहे. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात राऊत बोलत होते.

 

विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी टीका करताना म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकटं पाडायचं, शिवसेना नाव पुसून टाकायचं, या भ** करणाऱ्या 40 शिवसेना आमदारांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा जो धंदा सुरु आहे, तो उधळून लावून ही शिवसेना केवळ बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray), उद्धव ठाकरेंची आहे, तुमच्या बापजाद्याची कधी होऊ शकत नाही हे दाखवून देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल.

 

आडाण्याच्या हाताखाली काम करावे लागत
विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक करताना टोला लगावला. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून येणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला पाठवण्याचं पाप या शिंदे सरकारने (Shinde Government) केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या हुशार, अभ्यासू व्यक्तीवर सध्या दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. या आडाण्याच्या हाताखाली काम करावं लागत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांनी मराठी माणूस (Marathi Manus) मुंबई बाहेर गेल्याचे वक्तव्य केले होते.
त्यांच्या या वक्तव्याचा विनायक राऊत यांनी समाचार घेताना, एकनाथ शिंदेंना आता मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेल्याची आठवण झाली.
त्यांना आता मराठी माणूस आठवत आहे. तो देखील गुवाहाटी (Guwahati), सूरतला (Surat) जाऊन आठवत आहे,
असा टोला त्यांनी लगावला. किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली, असंही विनायक राऊत म्हणाले.

 

Web Title :- MP Vinayak Raut | shivsena vinayak raut on rebel mla maharashtra cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अश्लिल धंदे करता असे म्हणून तरुणीचा विनयभंग करणार्‍या चेअरमनसह तिघांना अटक

PM Kisan Yojana | पीएम किसानच्या पुढील हप्त्याबाबत आली नवीन अपडेट, कधी येणार तुमच्या खात्यात पैसे?

Flying Bike Video | स्वप्न नाही सत्य, ही आहे जगातील पहिली उडणारी बाईक, टॉप स्पीड- 100 kph