अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला ‘अल-कायदा’चा म्होरक्या ‘अल-रेमी’, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलं होतं 71 कोटींचं ‘बक्षीस’

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेने यमनमध्ये दहशतवादी संघटना अल-कायदा इन अरब पेनिसुलाचा नेता कासिम अल-रेमी याचा खात्मा केला आहे. व्हाइट हाऊसच्या माहितीनुसार, अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली. कासिम अल-रेमीबाबत माहिती देणार्‍यास ट्रम्प यांनी 10 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 71 करोड रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या हल्ल्यात अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी याला सुद्धा ठार करण्यात आले. कासिम अल-रेमी, दहशतवादी संघटना अल-कायदा इन अरब पेनिसुलाचे 2015 पासून नेतृत्व करत होता.

अमेरिकेवर निशाणा साधणार्‍यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशार्‍यावरून ठार करण्याची ही अलिकडच्या काळातील तिसरी घटना आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने दहशतवादी संघटना आयएसआयएसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी यास ठार केले होते. यावर्षी जानेवारीमध्ये ट्रम्प यांनी इराणच्या कुद्स फोर्सचे प्रमुख कासिम सुलेमानी यांना बगदाग मारले होते.

कोण होता कासिम अल-रेमी?
कासिम अल-रेमी ट्रम्प यांच्या निशाण्यावर बर्‍याच कालावधीपासून होता. जानेवारी 2017 मध्ये यमनमध्ये अलकायदाच्या परिसरावर अमेरिकन लष्कराने छापेमारी केली होती. या दरम्यान अमेरिकेच्या काही सैनिकांचा मृत्यू झाला होता. परंतु, अल-रेमी या हल्ल्यातून वाचला होता. नंतर त्याने 11 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी करून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधताना म्हटले होते की, त्यांना जबरदस्त थप्पड बसली आहे.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सुद्धा अल-रेमीने 18 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी करून नौदलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या गोळीबारात 4 लोक मारले गेले होते. याशिवाय सुरक्षा दलाशी संबंधित 8 अधिकारी जखमी झाले होते.