आमच ठरलंय, मी CM अन् मायावती PM : अखिलेश यादव

लखनौ वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकअंतिम टप्प्यात असून दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. मात्र, त्यापूर्वीच २३ मेच्या निकालाची चर्चा देशात जोर धरत आहे. देशाच्या राजकारणात उत्तरप्रदेशची महत्वाची भूमिका असते त्यामुळे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून आप-आपली रणनिती आखण्यात येत आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मायावती यांना पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहायचे तसेच सपा -बसपाची आघाडी कोणत्याही मजबुरीमुळे करण्यात आलेली नसून आघाडी ती एका संकल्पावर आधारीत आहे असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.

आमची आघाडी केवळ सपा -बसपा अशी नाही तर त्यासोबत आरएलडीदेखील आहे असल्याचा उल्लेख अखिलेश यांनी केला .मी मायावती यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी प्रयत्नशील असून मायावती ह्या मला मुख्यमंत्री बनविण्यासाठी मदत करणार असल्याचं अखिलेश यांनी म्हटलं आहे.