
US President Joe Biden | आयसिसचा म्होरक्या अल-हाशिमी अल-कुरेशीचा ‘खात्मा’, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशीला (Abu Ibrahim al-Hashimi al-Qureshi) ठार (Kill) केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) यांनी ट्विट करुन याला दुजोरा दिला आहे. आपल्या सूचनेनुसार अमेरिकन सैन्याने वायव्य सीरियामध्ये (Northwestern Syria) दहशदवादविरोधी (Terrorism) कारवाई केली. ISIS चा म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशी याला आम्ही ठार केले आहे, असे जो बायडन (US President Joe Biden) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
माझ्या सूचनेनुसार काल रात्री अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी ऑपरेशन (Counterterrorism Operation) यशस्वीपणे पार पाडले.
सशस्त्र दलांना (Armed Forces) अतुलनिय शौर्याबद्दल धन्यवाद, आम्ही ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशीला युद्धभूमीतून (Battlefield) हटवले आहे, असे जो बायडन (US President Joe Biden) यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी ऑपरेशनबद्दल बोलले होते. देव आमच्या सैनिकांचे रक्षण करो. बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियातील इदलिब प्रांतात अमेरिकेच्या विशेष मोहिमेदरम्यान 6 मुलांसह किमान 13 जण मारले गेल्याचे स्थानिक हवाल्याने मीडिया रोपर्ट्समध्ये म्हटले आहे.
Last night at my direction, U.S. military forces successfully undertook a counterterrorism operation. Thanks to the bravery of our Armed Forces, we have removed from the battlefield Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi — the leader of ISIS.
https://t.co/lsYQHE9lR9— President Biden (@POTUS) February 3, 2022
तुर्कीच्या सीमेजवळील (Turkish Border) एटमेह शहरात अमेरिकन सैन्याने ही कारवाई केली.
सैनिकांनी शहरातील एका इमारतीला लक्ष केले. जिथे युद्धामुळे हजारो विस्थापित राहत होते.
मात्र, इमारतीतील रहिवाशांची लगेच ओळख पटू शकली नाही.
काही अहवालात दावा केला जात आहे की या ऑपरेशनचे लक्ष्य ISILकिंवा अल कायदाचे नेते होते.
अमेरिकन सैन्य दलांनी दहशतवादविरोधी यशस्वी कारवाई केली आहे,
असे अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने (Pentagon) म्हटले आहे.
Web Title :- US President Joe Biden | us military forces kills isis leader abu ibrahim al hashimi al qurayshi says joe biden
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
APY | रू. 42 महिना जमा करून रू.1,000 महिना मिळवणार्यांची आहे मोठी रांग, जाणून घ्या योजना