महिलांना ‘सेक्स स्लेव्ह’ बनविणाऱ्या कथित ‘सेल्फ-हेल्प’ गुरू कीथ रेनियरला 120 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वत:ला ‘सेल्फ हेल्प’ गुरु म्हणवणाऱ्या आणि महिलांना ‘सेक्स स्लेव्ह’ बनविणाऱ्या किथ रॅनीयरला अमेरिकेच्या कोर्टाने 120 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कीथवर अनेक स्त्रियांनी फसवून करून सेक्स स्लेव्ह बनवल्याचा आणि नंतर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान कीथच्या फॉलोवर्समध्ये बरेच प्रसिद्ध आणि मुख्यत: श्रीमंत व्यक्तिमत्त्व होते, कीथने या कल्टला Nxivm नाव दिले होते.

मंगळवारी न्यूयॉर्कच्या एका कोर्टाने किथला सर्व आरोपांवर दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 60 वर्षीय किथला 120 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे म्हणजेच तो यापुढे तुरूंगातून बाहेर येऊ शकणार नाही. माहितीनुसार, कीथ पाच दिवसांच्या सेशनसाठी त्याच्या फॉलोवर्सकडून 5000 डॉलर घेत असे. अनेक महिलांनी आरोप केला की किथने केवळ पैशांचीच फसवणूक केली नाही तर लैंगिक शोषणही केले. त्याची संस्था पिरॅमिड स्ट्रक्चर अंतर्गत काम करत होती, ज्यामध्ये महिलांना ‘सेक्स स्लेव्ह’ आणि स्वत:ला ‘ग्रँड मास्टर’ हा दर्जा मिळाला होता. या महिलांसाठी किथबरोबर लैंगिक संबंध ठेवणे सक्तीचे होते.

काय होते आरोप ?
अनेक महिलांनी कीथवर सेक्स दरम्यान फोटो आणि व्हिडिओ घेतल्याचा आरोप केला होता आणि नंतर त्याच्याद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला होता. किथच्या आश्रमात बर्‍याच स्त्रियांशी प्राण्यांपेक्षा वाईट वागणूक दिली जात होती आणि सर्वांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात होते. कीथच्या विरोधात फसवणूक, लैंगिक तस्करी, खंडणी, गुन्हेगारी कट रचणे आणि 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. मुलीने कोर्टाला सांगितले की, किथने तिला फूस लावून तिला ‘सेक्स स्लेव्ह’ बनण्यास भाग पाडले.

एकूण 15 लोकांनी कीथविरूद्ध साक्ष दिली, त्यात 13 महिला आहेत. किथच्या या नेक्सियम कल्टवर एचबीओने काही दिवसांपूर्वी एक सिरीज देखील रिलीज केली होती, ज्यात त्या लोकांनी आपली कहाणी सांगितली, जे यात फसले होते. किथने मंगळवारी निकाल देण्यापूर्वी सर्व पीडितांची माफी मागितली आणि म्हंटले की, त्यांचे वेदना आणि राग समजू शकेल. त्याने केवळ आपला गुन्हा कबूल केला नाही तर स्वत:ला शिक्षा व्हावी यासाठी न्यायाधीशांना प्रार्थना केली. कीथसह अन्य 5 साथीदारांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.