43 वर्षीय महिलेला दिली ‘कोरोना’ ची पहिली ‘लस’, 6 आठवड्यापर्यंत ‘रिसर्च’ करणार ‘शास्त्रज्ञ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा हा डोस जर यशस्वी झाला तर बाजारात वॅक्सीन येण्यास 12 ते 18 महीने लागतील. कारण या लसीचा परिणाम समजण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. या परीक्षणासाठी 18 ते 55 वर्षांच्या 45 निरोगी लोकांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर 6 आठवड्यापर्यंत लसीच्या परिणामाचा अभ्यास करण्यात येणार आहे.

अमेरिकेत कोरोनाच्या लसीचे पहिले परीक्षण 45 लोकांवर 45 दिवसांपर्यंत चालणार आहे. अमेरिकन संशोधकांनी सोमवारी कोरोना व्हायरसच्या पहिल्या लसीचे पहिले परीक्षण केले. अमेरिकेच्या सियाटलमध्ये एका महिलेला प्रथम कोरोना वॅक्सीनचे इंजेक्शन देण्यात आले.

सियाटलच्या रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये एका डॉक्टरांनी कोविड-19 ची लस एका महिलेला दिली. ही लस कमी वेळेत विकसित करण्यात आली आहे. चीनमध्ये या आजाराची माहिती मिळताच केपीडब्ल्यू रिसर्च इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी हे वॅक्सीन विकसित करण्यावर मेहनत सुरू केली होती.

कोरोनामुळे भारतासह जगातील अनेक देशात वॅक्सीन विकसित केली जात आहे. या संस्थेच्या डॉक्टर लिजा जॅक्सन यांनी परीक्षणापूर्वी सांगितले की, आता आम्ही टीम कोरोना वायरस आहोत. या आपत्ती काळात प्रत्येक व्यक्ती काही तरी करण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या यशाबद्दल देशातील डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले की, क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात आली आहे, ही जगात सर्वात आधी विकासीत करण्यात आलेली लस आहे. अमेरिका या आजाराविरोधात अँटी व्हायरल आणि दुसरी थेरेपीसुद्धा विकसित करण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे.

आतापर्यंत 7000 पेक्षा जास्त मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगात 7000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून बाहेर आलेल्या आजाराने जगातील 145 देशातील लोकांना वेठीस धरले आहे, परंतु शास्त्रज्ञ अद्याप यावर लस शोधू शकलेले नाहीत.

माझ्यासाठी ही चांगली संधी

असोसिएटेडे प्रेसने सांगितले की, कोविड-19 ची पाहिली लस जेनिफर हॅलर नावाच्या एका महिलेला देण्यात आली, जी एका टेक कंपनीत ऑपरेशन मॅनेजर आहे.

43 वर्षांच्या या महिलेने म्हटले की, आम्ही सर्व असहाय असल्याचे अनुभवत आहोत, माझ्याकडे काहीतरी करण्याची ही चांगली संधी आहे. इंजेक्शन घेतल्यानंतर दोन मुलांची आई जेनिफरने हसत म्हटले की, मला चांगले वाटत आहे. या महिलेसह आणखी तीन लोकांना लस देण्यात आली आहे.

आता शास्त्रज्ञ या वॅक्सीनच्या परिणामाचा अभ्यास करत आहेत. लस सुरक्षित आहे का, आणि ती संसर्ग रोखतेय का, हे स्पष्ट करण्याचे आव्हान आता शास्त्रज्ञांसमोर आहे.

12 ते 18 महीन्यांची प्रतिक्षा

जर हे परीक्षण यशस्वी झाले तर बाजारात हे वॅक्सीन येण्यासाठी 12 ते 18 महीने लागतील. कारण या लसीचे परिणाम समजण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. या परीक्षणासाठी 18 ते 55 वर्षांच्या 45 निरोगी लोकांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर 6 आठवडे लसीचा परिणाम काय होतोय, याचा अभ्यास करण्यात येईल.