जर ‘हे’ घरगुती उपाय केले तर नाही करावं लागणार स्टोनचं ऑपरेशन, ‘तांदूळजा’ अन् ‘चाकवत’ खाल्ल्यामुळं एक ते 2 आठवडयात विरघळेल ‘मूतखडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   किडनी आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकते, परंतु काहीवेळा ही प्रक्रिया योग्यप्रकारे न झाल्यास मूत्रपिंडात खडे तयार होतात. बहुतेकदा जे अत्यल्प प्रमाणात पाणी पितात, त्यांना हा त्रास होतो. जेव्हा मीठ आणि खनिजे एकत्र येण्याची सुरुवात करतात तेव्हा अल्पावधीतच त्यांचे दगड बनतात. मूत्रपिंडात दगड तयार होताच एखाद्या व्यक्तीस असह्य वेदना होण्यास सुरुवात होते. काहीवेळा डॉक्टर ऑपरेशन करून ते काढून टाकण्याची शिफारस करतात. परंतु आपणास ऑपरेशन करायचे नसल्यास संयमाने या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही मूतखडा दूर करू शकता, तो विरघळवू शकता.

तांदूळजा

तुम्हाला मूत्रपिंडातील खडे स्वतःच विरघळून जावे असे वाटत असेल, तर यासाठी तुम्हाला तांदूळजा पालेभाजीच्या पाण्याचे सेवन वाढविले पाहिजे. मूतखडा विरघळविण्यात ते खूप प्रभावी आहे. या खड्यांबद्दल आपल्याला माहिती होताच आपण तांदूळजाचा अर्क असलेले उकळलेले पाणी पिण्यास सुरुवात करावी, म्हणजे खडे वितळण्यास सुरुवात होईल;तसेच उद्भवणारी वेदनादेखील दूर होईल.
चाकवत हिवाळ्यात चाकवत सहज उपलब्ध होते, जर तुम्हाला तुमच्या शरीरात एक ते दोन आठवड्यांच्या आत मूत्रपिंडातील खडे दूर करावयाचे असतील, तर दररोज चाकवतची हिरवी भाजी घ्या पाण्यात उकळा आणि गाळून घेऊन त्यात खडे (माेठे) मीठ घाला आणि थोड्या प्रमाणात तीन ते चार वेळा प्या.

जिरे

जिरे साखरेमध्ये मिसळल्यानंतर शरीरातून मूतखडा निघतो. हा उपाय महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जिऱ्यात साखर समान प्रमाणात घाला आणि थंड पाण्यात हे मिश्रण घालून दिवसातून तीन ते चार वेळा प्या. असे केल्याने मूतखडे लघवीतून निघून जातात.

बडीशेप

बडीशेप खाल्ल्याने मूत्रपिंड शुद्ध होते. आपल्या मूत्रपिंडात खडे असल्यास, दररोज जाता जाता बडीशेप खा. बडीशेप या समस्येवर खूप फायदेशीर आहे. पेस्ट बनवण्यासाठी रात्री एक लिटर पाण्यात बडीशेप, साखर आणि कोथिंबीर धने भिजवत ठेवावे. दुसर्‍या दिवशी सकाळी हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करा. ही पेस्ट दिवसातून तीन वेळा चमच्याने पाण्यात घालून प्यावी

पाणी

अधिक पाण्याचे सेवन करणे हा मूतखडा विरघळविण्याचा प्राथमिक उपचार आहे. जरी आपण एकत्र कोणतेही उपचार करत असाल तरीही जास्तीत जास्त पाणी पिणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर सर्व प्रथम ते तुम्हाला दिवसातून 13 ते 14 ग्लास पाणी पिण्यास सांगतील.