लहानपणी शरद पवारांच्या गाडीमागे पळत होतो, आता …. अमोल कोल्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लहानपणी शरद पवारांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडी मागे पळत होतो आता त्यांच्या पक्षात त्यांच्या सोबत काम करण्यास मिळत आहे अशी भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमाजवळ व्यक्त केली आहे.


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ.अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. देशात मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे मात्र ती दिशा त्यांना मिळत नाही. ती दिशा तरुणांना मिळवून देण्याचे सामर्थ शरद पवारांच्या नेतृत्वात आहे ,म्हणून त्यांचे हात बळकट करा असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

शिवसेनेचे सुसंस्कृत नेते उद्धव ठाकरे यांच्या सोबत काम करायला मिळाले याचा मला आनंद आहे. परंतु लहानपणी ज्या व्यक्तीची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीच्या मागे मी धावलो होतो आज त्यांच्याच पक्षात काम करायला मिळते आहे. याचा मला आनंद होतो आहे. तसेच यापुढे अखंडित राष्ट्रवादीचे काम करत राहणार आहे असे अमोल कोल्हे यांनी म्हणले आहे.