अनेक वेळा ‘प्रपोज’ केलं होतं तिनं, ‘इंटरेस्ट’ न दाखविल्यानं मुलाच्या चेहर्‍यावर मुलीनं केले चक्क ब्लेडनं सपासप ‘वार’

बरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एकतर्फी प्रेमात असलेल्या एका तरुणीने तिच्यासोबत शिकणाऱ्या युवकावर ब्लेडने वार केले आहे. यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. तरूणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या युवकाकडून पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली गेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बरेलीतील हाफिजगंज पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या इंटर कॉलेजशी संबंधित आहे. या महाविद्यालयात तरुण आणि तरुणी दोघेही शिकतात. शाळकरी मुलीला तो युवक आवडत होत. बर्‍याच वेळा तिने त्याला प्रपोज देखील केला पण युवकाने यात काही रस दाखविला नाही. याचा राग आल्याने त्या तरुणीने आज त्याच्या चेहऱ्यावर ब्लेडने हल्ला केला आहे. ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती.

असं बोललं जात आहे की, मुलाला शिक्षण घ्यायचे होते, पण तरुणी त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती. मुलाने तिला नकार दिला. यामुळे तिने भर रस्त्यावर त्याच्या तोंडावर ब्लेडने हल्ला केला. हे पाहिल्यावर ती तरुणी देखील बेशुद्ध झाली. असे सांगितले जात आहे की, मुलगी त्याला म्हणाली होती की, ‘तुला तुझ्या चेहऱ्यावर खूप अभिमान आहे, मग मी तुझा चेहरा कायमचा खराब करते.’ असे म्हणून तिने ब्लेडने हल्ला केला. सध्या मुलगा बोलण्याची स्थितीत नाही.

मुलाच्या चेहऱ्यावर ब्लेडचे निशाण आहेत. त्यामुळे मुलाची आई खूप अस्वस्थ झाली आहे आणि ती रडत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, हे सर्व कॉलेजबाहेर घडले आहे. एसपी ग्रामीण भागातील लोकांचे म्हणणे आहे की, मुलगा व मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत. आतापर्यंत पोलिसांत कोणतीही तक्रार केलेली नाही.