धक्‍कादायक ! ‘त्यानं’ आईला काकासोबत ‘झोप’ल्याचं पाहिलं, ‘तिनं’ खून करून मुलाचं ‘शीर’ बेडरूममध्ये लपवलं

लखनौ : वृत्तसंस्था – आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मेरठच्या सरधना येथील कपसाड गावात घडली आहे. एका आईने आपल्या पाच वर्षाच्या सावत्र मुलाचा खून करून त्याचे शिर बेडमध्ये लपवून ठेवले. मुलाने आईला काकासोबत विचित्र अवस्थेत पाहिले. त्यामुळे त्याचे तोंड कायमचे बंद करण्यासीठी त्याचा खून केल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार पांडेय यांनी सांगितले. आरोपी आईला अटक करण्यात आली आहे. तर मुलाचा काका फरार झाला आहे.

आयुष्मान असे खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. आयुष्यमान वडील आणि सावत्र आईसोबत रहात होता. त्याच्या आईचे वर्तन चांगले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात दररोड आयुष्यमान याच्यावरून वाद होत होते. गुरुवारी आयुष्यमान अचानक बेपत्ता झाला. घरातील लाडका मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. अखेर शोध घेताना त्याच्या रुमपर्यंत पोहचल्यानंतर घरच्यांना मोठा धक्का बसला. त्याठिकाणी शिर नसलेले आयुष्यमानचे धड कुटुंबीयांना आढळून आले.

कुटुंबियांना आयुष्यमानच्या आईवर संशय आल्याने त्यांनी बेडमध्ये पाहिले असता त्यामध्ये त्याचे शिर लपवून ठेवले होते. इतकेच नाहीत शिर लपवून त्यावर ती बसली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आईला अटक केली. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने गुन्हा कबुल केला असून आयुष्यमान याने त्याच्या काकासोबत आपल्याला विचित्र अवस्थेत पाहिल्याचे तिने सांगितले. याची वाच्चता कोठे होऊ नये यासाठी त्याचा खून केल्याचे सांगितले.
दरम्यान, मुलाचा काका घटनेनंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like