बनारस हिंदू विश्वविद्यालयात (BHU) शिकण्याचं स्वप्न बाळगणार्‍यांसाठी मोठी खुशखबर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियातील सर्वात मोठे काशी हिंदू विश्वविद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न असलेल्यांसाठी खुशखबर आहे. प्रवेश परिक्षा 2020 – 21 च्या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. 25 पदवी आणि 131 पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उमेदवार वेबसाइटवर जाऊन संंबंधित विषयासाठी अर्ज करु शकतात.

देशात 200 शहरात परिक्षेचे आयोजन –
मागील शैक्षणिक वर्षात जवळपास 5 लाख अर्ज आले होते असे असल्याने यापेक्षा जास्त अर्ज यंदा येण्याची शक्यता प्रशासनाला आहे. प्रशासनानुसार ऑनलाइन परिक्षा 26 एप्रिलपासून 29 मे दरम्यान देशाच्या विविध 200 शहरात आयोजित करण्यात येईल. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख निश्चित झाली आहे.

29 फेब्रुवारीपर्यंत जमा करु शकतात अर्ज –
विद्यापीठ प्रशासनानुसार प्रवेश परिक्षेसाठी उमेदवार आपला अर्ज 29 फेब्रुवारीपर्यंत जमा करु शकतात. या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील त्यानंतर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून उमेदवारांना प्रवेश पत्र देण्यात येईल. त्यासाठी विविध परिक्षा विविध तारखांना 26 एप्रिलपासून 29 मे पर्यंत देशभरात 200 शहरात परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येईल. तसेच प्रशासन यासाठी सहाय्यता सेलची निर्मिती करेल जेणेकरुन दूरुन येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.