पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडला ऑस्ट्रेलियाला घेऊन गेली ! पुढं झालं ‘असं’

पीलीभीत : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील एक 36 वर्षीय महिला पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडला सोबत घेऊन ऑस्ट्रेलियाला गेल्याचा प्रकार उघड झाला आहे. तिथून परत आल्यानंतर दोघांच्या प्रेमसंबंधांचा भांडाफोड झाला आहे. ही महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत 6 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांना मार्चमध्ये परत यायचं होतं. परंतु लॉकडाऊनमुळं ते तिकडंच अडकले होते. 24 ऑगस्टला ते परतले आहेत.

महिला आपल्या प्रियकरासोबत परत आल्यानंतर पतीनं (वय 46) पोलिसात तक्रार दिली. पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड संदीप सिंह (वय 36) यांचे अनैतिक संबंध आहेत. दोघांनी मिळून बनावट कागदपत्रांच्या आधारे पतीच्या नावे पासपोर्ट तयार केला होता. या दाम्पत्याची मुलं ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत. पतीनं केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक जय प्रकाश यादव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.

पतीनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर एफआयआर दाखल झाली आहे. तक्रारदार पती हा गेल्या 20 वर्षांपासून मुंबईत काम करतो. कधी कधी तो पत्नीला भेटण्यासाठी घरी जातो. त्याची पत्नी पीलीभीतमध्ये फार्महाऊस आणि शेतीचं काम पाहते.

पतीनं सांगितलं की, “मी 18 मे रोजी घरी परत आलो असता माझी पत्नी घरी नाही असं मला समजलं. दोघंही ऑस्ट्रेलियाला गेले आहेत असं मला समजलं. संदीप माझ्या नावानं पासपोर्ट तयार करून परदेश दौऱ्यावर तर गेला नाही हे जाणून घेण्यासाठी मी बरेलीत पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यावेळी 2 फेब्रुवारी 2019 रोजी माझ्या नावानं पासपोर्ट तयार केला आहे अशी माहिती मला कार्यालयातून देण्यात आली.”

या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली आहे. बनावट पासपोर्ट तयार कसा केला गेला याची चौकशी देखील केली जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.