उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्घाटन केलेलं लसीकरण केंद्र बंद असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या सोयीसाठी पुण्यातील हडपसर येथे उभारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटरचे (vaccination center) उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 31) करण्यात आले होते. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (दि. 1) आज लसीकरण बंद असल्याचे फलक केंद्राबाहेर लावण्यात आले आहे. उद्घाटन झालं पण लसच उपलब्ध नसल्याने हे केंद्र (vaccination center) बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. उदघाटन झाल्याच्या वर्तमानपत्रातील बातम्या वाचून अनेक जेष्ठ नागरिक निराश होऊन घरी परतल्याचे चित्र दिसून आले.

एकीकडे वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडे अपुर लसीकरण यामुळे राज्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. दरम्यान जून महिन्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे लसीकरणाचा लाभ नेमका कधी मिळतो, हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या आतापर्यंतच्या दोन लाटांमध्ये एप्रिलमध्ये संसर्गाचा सर्वाधिक उद्रेक झाल्यानंतर मे महिन्यात कोरोना रुग्णसंख्या बरीच नियंत्रणात आली आहे. मे महिन्यात दैनंदिन करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक राहिले. गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारांपेक्षा कमी आहे.

 

Also Read This : 

 

Pune : पोलिसांची शासकीय गाडी मद्यपी चालकाच्या हाती, शिक्रापूर-चाकण चौकातील खळबळजनक प्रकार

 

कोरोना काळात किचनमधील ‘या’ 5 गोष्टी साफ करण्यास विसरू नका, जाणून घ्या

 

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक, पत्नी निशाने मारहाण केल्याची दाखल केली होती तक्रार

 

कोरोनाच्या उपचारात ‘हा’ देशी उपाय आणखी वाढवतोय धोका, डॉक्टरांनी केले सावध (Video)

 

‘नेमकं चाललंय काय? मलाही प्रश्न पडलाय’, पवार-फडणवीस भेटीवर चंद्राकांत पाटलांची सूचक प्रतिक्रिया

 

लठ्ठपणा ‘या’ 5 पध्दतीनं नियंत्रित करा, असंख्य गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो कमी, जाणून घ्या