Vaishali : PPE किट घालून अर्ज दाखल करण्यासाठी पोहचला उमेदवार, समर्थक वाटत होते ‘मास्क’

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये उमेदवारी दाखल करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याची अनेक वृत्त येत आहेत, तर आज येथे एका उमेदवाराने कोविड-19 च्या गाईडलाइनचे अशाप्रकारे पालन केले की, सर्वजण हैराण झाले. हाजीपुर विधानसभा मतदार संघातील जन अधिकार पार्टीचा उमेदवार पीपीई किट घालून अर्ज दाखल करण्यासाठी आला.

इतकेच नव्हे, सोबत आलेले समर्थक, पादचार्‍यांना आणि पोलीस जवानांना मास्कचे वाटत करत होते. वैशाली जिल्ह्यातील हाजीपुर विधानसभा मतदारसंघातील पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीचे उमेदवार दीपक कुमार शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी पोहचले.

त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. दीपक कुमार यांनी पीपीई किट घातला होता. डोक्यापासून पायापर्यंत कव्हर दीपक कुमार यांना पाहून सर्वजण हैराण झाले. जिल्हा मुख्यालयात पोहचल्यानंतर उमेदवाराच्या समर्थकांनी तेथे उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांना मास्क वाटण्यास सुरूवात केली.

जेव्हा दीपक कुमार यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग खुप वेगाने पसरत आहे. निवडणुकीचा काळ असला तरी कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही, अशावेळी सावधगिरी बाळगली नाही तर लोकांचा जीव धोक्यात येईल.

दीपक यांनी म्हटले, पीपीई किट घालून उमेदवारी दाखल करणे हे लोकांना जागृत करण्याच्या ÷उद्देशाने करण्यात आले.