‘तुळ’ राशीत ‘बुध’चं ‘संक्रमण’, राशीनुसार ‘हे’ उपाय केल्यास होईल ‘लाभ’, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बुध ग्रह 7 नोव्हेंबर 2019 रोजी तुला राशीत प्रवेश करीत आहे. जणून घ्या 12 राशींवर काय परिणाम होईल याविषयी –

मेष –
मेष राशीच्या सातव्या घरात बुधाचे संक्रमण व्यवसायामध्ये आणि भागीदारीमध्ये लाभ देईल .
उपाय: दुर्गादेवीच्या मंदिरात खडीसाखर आणि बडीशेप अर्पण करा आणि गाईला चारा खायला द्या.

वृषभ-
वृषभ राशीच्या सहाव्या घरात बुधचे संक्रमण त्वचेच्या समस्या निर्माण करू शकते तसेच परस्पर संबंध बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते.
उपाय: गणपतीला हिरव्या दुर्वाची पाने अर्पण करावी आणि ॐ बुं बुधाये नमः मंत्राचा जप करावा.

मिथुन-
मिथुन राशीच्या पाचव्या घरात बुधचे संक्रमण पोटाच्या समस्या दूर करेल तसेच अडकलेले धन प्राप्त करून देईल .
उपाय: आवळ्याचे सेवन करा व लेखन साहित्य दान करा

कर्क-
कर्क राशीच्या चौथ्या घरात बुधचे संक्रमण नोकरीतील समस्या दूर करण्याबरोबरच कुटुंबात चढ-उतार आणू शकते.
उपाय: गणपतीला हिरव्या दुर्व्यासह दोन लाडू अर्पण करा आणि लहान मुलींना मिठाई द्या.

सिंह-
लहान भावंडांसोबत असणारा वादविवाद संपेल आणि त्याचबरोबर मान सम्मान प्राप्त होईल.
उपाय: सूर्याला नमस्कार करा आणि गणपती स्तोत्र पाठ करा

कन्या-
पैशाची समस्या दूर होईल तसेच कौटुंबिक जीवनात शांती मिळेल.
उपायः आपल्या घराच्या उत्तर दिशेने पाणी भरा आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा.

तुळ-
तुळ राशीमध्ये बुधचे संक्रमण स्थिर संपत्ती मिळण्याबरोबरच मानसिक समस्या वाढवू शकते.
उपायः ॐ गजाननाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

वृश्चिक-
वृश्चिक राशीपासून बाराव्या घरात बुधचे संक्रमण मानसिक समस्या वाढेल तसेच विनाकारण खर्चही वाढवेल.
उपाय: लहान भावंडांना काही भेटवस्तू द्या आणि भगवान विष्णूच्या मंदिरात पिवळी फुले अर्पण करा.

धनु-
धनु राशीच्या अकराव्या घरात घरात बुध जात असल्याने संपत्ती वाढेल तसेच मान सम्मानात वाढ होईल.
उपायः सकाळी सकाळी वेलची खा आणि गरजू लोकांना जेवण अवश्य द्या.

मकर-
मकर राशीच्या दहाव्या घरात बुधचे संक्रमण नोकरी व्यवसाय तसेच भाग्यात वृद्धी करेल.
उपाय: गायीला हिरवा चारा खायला द्या व गरजूंना औषध कपडे तसेच भोजन द्या.

कुंभ –
राशीत नवव्या घरात बुधाचे संक्रमण अडचणी निर्माण करू शकतो.
उपाय: भगवान विष्णूला पिवळ्या फळांची फुले अर्पण करा आणि मुलींचा सन्मान करा.

मीन –
राशीच्या आठव्या घरात बुधाचे संक्रमण काही आरोग्याशी संबंधित समस्या वाढवेल तसेच खर्चातही वाढ होईल.

उपाय: सकाळी दुर्गा चालीसाचे पठण करा आणि लहान मुलींना लेखन सामग्री दान करा.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like