अपक्ष उमेदवार कलाटे यांना वंचित बहूजन आघाडीचा पाठिंबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून राहूल कलाटे यांना वंचित बहूजन आघाडीने पञक काढून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची काही दिवसांपुर्वी भेट घेतली होती . चिंचवड विधानसभेतील अपक्ष उमेदवारांनी वंचित आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी मागणी उमेदवार राहूल कलाटे यांनी केली होती. त्यानूसार वंचित बहूजन आघाडी व भारिप कार्यकर्ते व पदाधिका-यांनी नोंद घ्यावी, असेही म्हटले आहे.

राहूल कलाटे पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेतेपदी आहेत. मागील वेळी म्हणजे 2014 ला शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. त्यावेळेला राहुल कलाटे सेनेचे तर लक्ष्मण जगताप भाजपचे उमेदवार होते. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार असल्याने चिंचवडमध्ये चौरंगी लढत झाली होती. मोदी लाटेत कलाटे ह्यांना दोन नंबरची मते मिळाले होते.

visit : policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like