Vanchit Bahujan Aghadi To Congress | VBA चा काँग्रेसला अल्टिमेटम! ७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू

मुंबई : Vanchit Bahujan Aghadi To Congress | काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी तयार केली. मात्र, इंडिया आघाडी (India Alliance) तसेच मविआमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यास टाळाटाळ सुरू आहे. काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर व्हीबीएने काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे. सात दिवसात उत्तर न आल्यास व्हीबीए महाराष्ट्रात ४८ जागा लढवणार, असा इशारा दिला आहे. (Vanchit Bahujan Aghadi To Congress)

वंचितचे प्रवक्ते अ‍ॅड. प्रियदर्शी तेलंग यांनी १ सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना याबाबत पत्र पाठवले होते. परंतु काँग्रेसकडून अद्याप यावर कुठलेही ठोस उत्तर आलेले नाही. त्यामुळे संतापलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ७ दिवसांची मुदत दिली आहे, अशी माहिती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Vanchit Bahujan Aghadi To Congress)

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या एक्स हँडलवर ते पत्र सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला, परंतु मल्लिकार्जुन खरगे किंवा काँग्रेसमधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याने प्रतिसाद दिलेला नाही.

व्हीबीएला हे जाणून घ्यायचे आहे की आम्हाला कधीतरी उत्तर मिळणार आहे का? मिळणार नसेल तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, काँग्रेसला वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ६.९८ आणि ५.५७ टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले नाही, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, असे आंबेडकर म्हणाले.

ते म्हणाले, २०१९ पासून ज्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदारांची संख्या वाढली आहे.
असा पक्ष युतीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. प्रामुख्याने काँग्रेसने त्यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या सर्व
खोट्या बातम्या आणि खोट्या कथा तसेच सोशल मीडियावर नव्याने कामाला लावलेल्या ट्रोल्सकडून व्हीबीएला
आमंत्रण मिळाले आणि त्यांनी ते नाकारले हा खोटारडेपणा थांबवला पाहिजे.

जर काँग्रेसला आमच्या ई-मेलला उत्तर द्यायचे असेल आणि व्हीबीएसह युती करायची असेल तर ते पुढील ७ दिवसांत
उत्तर देऊ शकतात. अन्यथा आम्ही सर्व ४८ जागा लढवण्याच्या आमच्या योजनेनुसार पुढे जाऊ.
कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४८ जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत,
असा इशारा व्हीबीएने दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Narendra Modi-Urjit Patel | पंतप्रधान मोदी RBI गव्हर्नरला म्हणाले होते, पैशाच्या ढिगार्‍यावर बसलेला साप, कोणी सांगितला प्रसंग…वाचा