नांदेड येथे वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता मेळावा संपन्न

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) – नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, एम. आय. एम व सहयोगी संघटनेचा जिल्हा, महानगर, तालूका पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा आज (दि, २४ मार्च रोजी) म. फुले मंगल कार्यालय शिवाजीनगर नांदेड येथे आज संपन्न झाला.

यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघातील तालुका, शहर पदाधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात बूथ बांधनी व गाव पातळी, तालूका, शहर संघटनात्मक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांधनी बाबत आढावा घेण्यात आला. प्रत्येक तालूका पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सुचना ऐकून त्यावर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.

याप्रसंगी नांदेड लोकसभा उमेदवार प्रा. यशपाल भिंगे, एम. आय. एम चे मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला, वंचित आघाडीचे जेष्ठ नेते नागोराव शैंडगे बापू, रामचंद्र येईलवाड, जि.अध्यक्ष शिवाजी गेडे़वाड, डॉ. संघरत्न कुर्हे, बालाजी खरडे पाटिल, हिंगोली लोकसभा उमेदवार मोहन राठोड यांनी मार्गदर्शन केले. कुमार कुर्तडिकर, बाळासाहेब सोनकांबळेसह जिल्हा, तालूका, शहर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.