Vanchit Vikas Sanstha | छोट्या व्यावसायिकांना प्रदर्शनातून ‘वंचित विकास’चा मदतीचा हात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित विकास संस्थेतर्फे (Vanchit Vikas Sanstha) विपरीत परिस्थितीवर मात करून ‘पुनश्च हरिओम’ करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rang Mandir, Pune) येथे भरविण्यात आले होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून या व्यावसायिकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न वंचित विकासने केला. नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके (Corporator Adv. Gayatri Khadke) व माधुरी सहस्त्रबुद्धे (Corporator Madhuri Sahasrabuddhe) यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रसंगी वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते. (Vanchit Vikas Sanstha)

 

कोरोनाच्या काळात छोट्या व्यावसायिकांना वंचित विकास संस्थेकडून त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी अर्थसाह्य केले होते.
त्यांचे तसेच छोट्या व्यावसायिकांच्या (प्राधान्याने स्त्री व्यावसायिकांची) उत्पादनांचे प्रदर्शन भरविले.
एकूण २५ स्टॉल यामध्ये सहभागी झाले होते.
खाद्यपदार्थ, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, ज्वेलरी, पर्स, बॅग्ज, हार्बल कॉस्मेटिक्स, सेंद्रिय भाजी, धान्य, गिर गाईचे तूप, मेंदी, तसेच ई – वेस्ट व सामाजिक संस्थेची माहिती देणारे स्टॉल होते. (Vanchit Vikas Sanstha)

व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत वंचित विकास संस्थेने त्यांना आधार दिला आहे.
आता कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर हे व्यावसायिक जिद्दीने उभे राहताहेत, ही आनंदाची बाब आहे.
पुणेकर नागरिकांनी अशा छोट्या व्यावसायिकांच्या प्रदर्शनाला प्रतिसाद देऊन, त्यांच्याकडून उत्पादने खरेदी करावीत व त्यांना हातभार लावावा, असे आवाहन अ‍ॅड. गायत्री खडके व माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.

 

Web Title :- Vanchit Vikas Sanstha | A helping hand of deprived development to small businesses through exhibitions

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा