Vande Mataram GR in Maharashtra | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ, शासनाचा जीआर निघाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vande Mataram GR in Maharashtra | महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी (Rashtrapita Mahatma Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ होत आहे. वंदे मातरम (Vande Mataram) म्हटल्यावर इंग्रज रागवायचे, दंड करायचे. महाराष्ट्रात आता यापुढे फोनवर असो किंवा एकत्र येऊन बोलताना हॅलो (Hello) ऐवजी, वंदे मातरमने संवादाची सुरुवात करावी. यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर (Vande Mataram GR in Maharashtra) काढला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.

 

राज्य सांस्कृतिक विभागाच्या (State Cultural Department) वतीने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन उद्या (2 ऑक्टोबर) रोजी करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जीआरची माहिती दिली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) हे उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त विविध स्पर्धा, शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.

या महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचं मुहूर्त साधून उद्यापासून याची सुरुवात होत आहे.
आनंद मठमध्ये (Ananda Math) हे गीत लिहिताना जन गण मन हे राष्ट्र गीत आणि वंदे मातरमला मान्यता देण्यात आली.
इंग्रजांना हे गीत त्रास देणारे वाटायचे. हे शब्द आम्हाला प्राण प्रिय आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
संभाषणाची सुरुवात हॅलोने झाली. ती वंदे मातरमने व्हावी, मग ती मोबाईलवर असो की दोघांमधील चर्चा,
असा आमचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच हे अभियान आहे, सक्ती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Web Title :- Vande Mataram GR in Maharashtra | vande mataram gr in maharashtra instead of hello you have to say vande mataram from tomarrow eknath shinde governments gr is released sudhir mungantivars announcement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हडपसरमधील रामटेकडी भागात टोळक्याची दहशत दोघांवर शस्त्राने वार

Maharashtra Congress | काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका!

Ajit Pawar | चिठ्ठी आयी है, आयी है…भाषण सुरू असतानाच अजितदादा गुणगुणले गाणं, कार्यकर्त्यांमध्ये हास्यकल्लोळ!