×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | हडपसरमधील रामटेकडी भागात टोळक्याची दहशत दोघांवर शस्त्राने वार

Pune Crime | हडपसरमधील रामटेकडी भागात टोळक्याची दहशत दोघांवर शस्त्राने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आम्हाला ओळखत नाही का? असे म्हणत दोघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करत टोळक्याने परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी 6 जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) हडपसरमधील (Hadapsar) रामटेकडी परिसरात घडला आहे.

 

या प्रकरणी चिक्क्या भडके, बंटी निकाळजे, मोनू शेख, आर्यन माने, सुनीत शिंदे, चिनू, अनिकेत सोनवणे यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनमोहन मृत्युंजयप्रसाद तिवारी (वय 24, रा. गोसावी वस्ती, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक सागर चतुर्वेदी, प्रिन्स गौतम, आशिष तिवारी,
संकर्षण तिवारी रामटेकडी परिसरातील अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ (Annabhau Sathe Park) गप्पा मारत थांबले होते.
त्यावेळी चिक्या भडके व त्याचे इतर साथिदार त्याठिकाणी आले. त्यांनी तिवारी आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्हाला ओळखले नाही का? अशी विचारणा करत शिवीगाळ केली.
आरोपींनी फिर्यादी आणि आशिष तिवारी यांच्यावर धारदार चाकुने वार केले.
तसेच त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले (PSI Bhosale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Ramtekdi area of Hadapsar, gang terror attacked two with weapons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | चिठ्ठी आयी है, आयी है…भाषण सुरू असतानाच अजितदादा गुणगुणले गाणं, कार्यकर्त्यांमध्ये हास्यकल्लोळ!

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याव्यापी आंदोलन करू, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News