वाकड-पिंपळे निलख मध्ये विविध विकासकामांना लवकरच सुरुवात 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन  – वाकड-पिंपळे निलख भागात स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी दिवाळीमध्ये आश्वासने दिलेल्या विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहेत.

प्रभाग क्र. २६ काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक पर्यंत सिमेंट कॉंक्रिट चा रस्ता करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट कॉंक्रिट चा करणे, पिंपळे निलख मधील अंतर्गत रस्ते सिमेंट कॉंक्रिट चे करणे, कावेरी सब वे ते पिंक सिटी रस्ता सिमेंट कॉंक्रिट चा करणे, वाकड पिंपळे निलख मध्ये विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र करणे, वाकडमध्ये रोड फर्निचर ची कामे करणे, वाकड गावठाण मधील रस्ते सिमेंट कॉंक्रिट चे करणे, वाकड येथील भुजबळ वस्ती मधून कालखंडाक मार्ग भूमकर वस्ती येथील हिंजवडी ३१ MDR रस्त्यालगत जोडणारा ३० मी. रस्ता विकसित करणे इ. अशी जवळजवळ ९२.८५ कोटी ची विकासकामे स्थायी समिती अध्यक्षा ममता विनायक गायकवाड यांच्या पाठ पुराव्यामुळे वाकड पिंपळे निलख मध्ये होणार आहेत.

स्मार्ट प्रभागाच्या दृष्टीने हि सर्व विकासकामे काढण्यापासून ते मार्गी लावण्यापर्यंत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे व आज हि सर्व विकासकामे अंतिम टप्पयात असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून हि कामे चालू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षामध्ये हि सर्व विकासकामे चालू करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांनी सांगितले.