Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Varsha Gaikwad | कोरोनामुळे मागील दिड वर्षापासून बंद असलेल्या शाळा (School started) सुरु करण्यास अखेर राज्य सरकारकडून (State Government) हिरवा कंदिल मिळाला. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमानूसार येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शाळा जरी सुरु होत असतील तरी पालकांवर (guardian) एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. याबाबत माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.

शिक्षण विभागाने (Department of Education) शाळा सुरू करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. यांनतर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळा सुरु करण्याबाबत आणि पालकांबाबत नियमावलीची माहिती दिली आहे. त्यावेळी गायकवाड ह्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

 

काय आहेत पालकांसाठी सूचना –

त्यावेळी माहिती देताना वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या की, कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करत आहोत. तर, विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. आपल्या पाल्याला युनिफॉर्म घालणे, घरी येऊन काळजी घेण्याची पूर्ण खबरदारी घ्यायची आहे. पालकांच्या (guardian) संमतीशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसेच, आजारी विद्यार्थी कसा शोधावा याची माहिती शिक्षकांना दिली आहे. त्यानुसार, शाळेत सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे, असंही गायकवाड म्हणाल्या.

दरम्यान, मुंबई लोकल प्रवास हा २ डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींना सुरू आहे.
स्थानिक पातळीवर शिक्षकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी आयुक्तांनी निर्णय घ्यायचा आहे.
म्हणून शहरी भागात आयुक्तांना यात समावेश केला आहे.
तसेच, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी लसीकरण करावं याकडे लक्ष असेल, यासाठी 8 दिवसांचा कालावधी आहे,
असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Web Titel :- Varsha Gaikwad | maharashtra school reopen from 4 october now the school will start big responsibility on parents said varsha gaikawad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Pune Crime | पुण्यात दुधामध्ये भेसळ ! अन्न औषध प्रशासनाकडून FIR दाखल

Nitin Gadkari | नितीन गडकरींची पुण्यात टोलेबाजी; म्हणाले – ‘माझ्याकडं पैशाची कमी नाही अन् मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायला जात नाही’ (व्हिडीओ)