Varsha Gaikwad | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं मोठं विधान; म्हणाल्या – ‘…तर शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेऊ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Varsha Gaikwad | मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा, महाविद्यालयांना (Schools, colleges) टाळं लागलं होतं. यानंतर सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्यास राज्य सरकारने (Maharashtra Government) परवानगी दिली. अनेक वर्षापासून शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यामध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. परंतु, कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Covid Variant) वाढता धोका पाहता शाळा पुन्हा बंद होऊ शकतात. असं विधान राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केलं आहे.

 

वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची (Omicron Covid Variant) संख्या दिवसागणिक वाढत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली. आता हा आकडा 50 च्या पुढे गेलाय. हे पाहता. ‘ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आम्ही परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत,’ असं देखील गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात शाळा 1 डिसेंबरपासून सुरू झाल्या. 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरू
झाल्यानंतर ग्रामीण भागांत 1 ली ते 4 थी आणि शहरी भागांत 1 ली ते 7 वीचे वर्ग देखील ऑफलाइन सुरू
करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं मागील महिन्यात घेतला.
दरम्यान, सध्या राज्यात नाही तर देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
दिल्ली आणि महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णांची (Maharashtra Omicron variant) आकडेवारी देशात सर्वाधिक आहे.
या विषाणूला रोखण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे.

 

Web Title :- Varsha Gaikwad | might take decision close schools if omicron cases increases says maharashtra education minister varsha gaikwad
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण पण चांदी ‘जैसे-थै’, जाणून घ्या नवीन दर

Ration Card Update | तुमचा सुद्धा झाला असेल विवाह तर रेशन कार्ड करा अपडेट, अन्यथा मिळणार नाहीत अनेक विशेष सुविधा; जाणून घ्या प्रक्रिया

Viral Video | परीक्षेत करत होता कॉपी, डोक्यावर होता विग; कानात लपवले होते ईयरफोन (व्हिडीओ)

Sara Ali Khan | सावत्र आई करिना कपूरच्या ‘या’ अदावर फिदा आहे सारा अली खान, म्हणाली – ‘दोन मुलांची आई असून पण…’

Poonam Pandey | पूनम पांडे अतिटाईट कपडे घालून पोहोचली मुंबई एअरपोर्टवर, कॅमेर्‍याची लाईट पडताच लोकांना वाटली लाज