अभिनेता वरुण धवनचा ‘गर्लफ्रेंड’सोबत ‘गुपचूप’ साखरपुडा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्टर वरूण धवन आणि त्याची गर्लफ्रेड नताशा दलाल बी टाऊनमधील पॉप्युलर कपल्सपैकी एक आहे. मागील काही आठवड्यांपासून दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहे. परंतु याबाबत अजून काही कंफर्म माहिती समजलेली नाही. नुकताच वरूण आपली गर्लफ्रेंड नताशा सोबत करण जोहरच्या लेट नाईट पार्टीत स्पॉट झाला होता. यावेळी त्याच्यासोबत दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, यांसारखे कलाकार उपस्थित होते.

वरूण नताशाच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वरुण धवन 2020 पर्यंत लग्न बंधनात अडकू शकतो. परंतु सध्या अशी बातमी आली आहे की, त्याने 2018 सालीच नताशा दलाल सोबत साखरपुडा केला आहे. दोघांची एंगेजमेटं हा एक प्रायव्हेट सेरेमनी होता. यात काही कुटुंबीय आणि खास मित्रांची उपस्थिती होती.

परंतु या सिक्रेट एंगेजमेंटमध्ये किती सत्य आहे याबाबत वरूण किंवा त्याच्या फॅमिलीकडून कोणाचीच काही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. असेही समजले होते की, दोघांनीही लग्नासाठी प्रियंका चोपडा आणि निक जोन्सच्या वेडिंग प्लॅनरची निवड केली होती. वेडिंग प्लॅनर मोटवाने एंटरटेंमेंट अँड वेडिंगने प्रियंका चोपडा आणि निक जोन्स यांच्या लग्नाची पूर्ण तयारी केली होती. नताशा आणि वरूण एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.

दोघांची फॅमिलीही एकमेकांच्या खूप क्लोज आहे. वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच तो फिल्म स्ट्रीट डान्सर 3 डी मध्ये झळकणार आहे. याशिवाय तो पिता डेविड धवनचा सिनेमा कुली नंबर 1 च्या रिमेकमध्येही दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त