Vasant More | ‘तुम्हीही येता जाता थोडे लक्ष ठेवा राव, मला तुमच्या मदतीची गरज आहे…’ वसंत तात्यांची जनतेला साद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे कायम त्यांच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. कधी विकासकामे तर कधी समाजकल्याण तर काही बिंधास तात्या म्हणून त्यांची सोशल मीडियावर कायम क्रेझ असते. आज वसंत मोरेंनी (Vasant More) त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्याखालील कॅप्शनमध्ये ते लोकांना येता जाता लक्ष ठेवा असे आवाहन करत आहेत.

 

पालिकेवर (Pune PMC) प्रशासकराज असून माजी नगरसेवक वसंत मोरे स्व:खर्चातून परिसरातील विकासकामे करत आहेत. मात्र काही लोकांनी त्यांची प्रचंड नासधुस केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. सुशोभिकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असतानाच हा मोडतोडीचा प्रकार घडल्याने वसंत मोरे यांनी समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. मी एकटा नाही लक्ष ठेवू शकत, तुमच्या मदतीची गरज आहे, अशी भावनिक साद ही त्यांनी नागरिकांना घातली आहे.

 

 

वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून आणि ते उभे करू शकतील एवढ्या बजेटमधून भारती विद्यापीठ कमान ते लेक टाऊन (Bharti Vidyapeeth Kaman To Lake Town) या वर्दळीच्या पण प्रचंड दुरवस्था झालेल्या रस्त्याचे मोरे यांनी दोन वर्षांपूर्वी सुशोभीकरण (Embellishment) केले. रस्त्यावर सातत्याने कचरा टाकण्यात येत असल्याने आणि मोकाट डुक्करांचा मोठा वावर असल्याने मोरे यांनी योग्य त्या उपाययोजना करत या प्रकाराला आळा घातला. रस्त्यांच्या उंचवट्याच्या भाग लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त केला. रस्त्या बाजूला लॉन आणि स्पिंकलर्स (Sprinklers) बसविले होते. काही दिवसांपूर्वी स्पिंकलर्सची चोरी झाली होती.

वर्षभर निवडणूक नसल्यामुळे कामाची डागडुजी करण्यासाठी प्रशासनाकडे कोणतेही बजेट (Budget) उपलब्ध नव्हते.
त्यामुळे वसंत मोरे यांनी स्वखर्चाने सर्व कामे पूर्ण केली. मात्र बुधवारी सायंकाळी या कामाची तोडफोड झाल्याचा
प्रकार घडला आणि मोरे यांनी समाज माध्यमातून त्याबाबत पोस्ट करत नाराजी बोलून दाखवली.
हा प्रकार कसा घडला याबाबत कोणाला माहिती असल्यास ती द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
राजकीय आकसातून हा प्रकार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच तीव्र उतारावरून
आलेल्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने तो लाकडी फळे यांना धडकल्याची माहिती
एका प्रत्यक्षदर्शीने वसंत मोरे यांना दिली आणि मोडतोड कशामुळे झाली याचा अखेर उलगडा झाला.

 

माझे नागरिकांना आवाहन आहे, हे काम मी माझ्या वैयक्तिक पैशातून करतोय, तुम्हीही येता जाता थोडे लक्ष ठेवा राव.
मी एकटा नाही लक्ष ठेवू शकत, तुमच्या मदतीची गरज आहे , असे आवाहन वसंत मोरे (Vasant More) यांनी नागरिकांना केले आहे.

 

 

Web Title :  Vasant More | ‘You also come and pay attention Rao, I need your help…’ Vasant Tati’s message to the public

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा