‘हे’ वास्तूदोष असल्यास तुम्हाला रात्री येणार नाही ‘शांत’ झोप, जाणून घ्या ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन – आज कामाच्या व्यापात असलेल्या प्रत्येकाला आपला थकवा दूर करण्यासाठी आवश्यक असते ती झोप. परंतू तुम्ही झोपत असलेल्या बेड रुम मध्ये काही वास्तू दोष असल्यास तुम्हाला गाढ झोप लागणार नाही. त्यामुळे आपण झोपत असलेल्या ठिकाणचे वातावरण कसे आहे, वास्तूशास्त्राशी मिळते जुळते आहे का याचा विचार करणे आवश्यक आहेत.

त्यामुळे हेच वास्तूदोष दूर केल्यास तुम्हाला चांगली झोप लागू शकतील आणि जीवन आनंदी होईल.

1. वास्तूशास्त्रातील काही उपाय केल्यास तुम्हाला शांत झोप येईल. बेडरूमच्या वरच्या बाजूस कोणताही पाण्याचा स्त्रोत असू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते.

2. वास्तूशास्त्रात काही लोकांच्या बेडरूममध्ये टीव्ही, कॉम्प्यूटरसारख्या इलेक्ट्रिक गोष्टी असतात. हा एक वास्तूदोष मानला जातो. यामुळे बेडरूममध्ये या वस्तू ठेवू नका.

3. तुम्ही झोपत असलेल्या बेडरूममधील बेडकडे विशेष लक्ष द्या. जर तुमचा बेड चुकीच्या दिशेला असेल तर तो वास्तूदोष आहे. त्याचा आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.

4. वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये पाणी, वाहता झरा किंवा पर्वतांचा फोटो लावू नये. त्यामुळे तुमच्या जीवनात वाद निर्माण होऊ शकतात. समस्या उद्भवतात.

 

आरोग्यविषयक वृत्त –