Vegan Vitamin D Sources | शाकाहारी लोकांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत 3 बेस्ट व्हिटॅमिन डी फूड सोर्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vegan Vitamin D Sources | शरीर निरोगी राहण्यासाठी अनेक जीवनसत्त्वांची गरज असते आणि सर्व जीवनसत्त्वांचे वेगवेगळे फायदे असतात. शरीराला इतर जीवनसत्त्वांच्या तुलनेत व्हिटॅमिन डीची थोडी जास्त गरज असते. मांसाहार करणार्‍यांना व्हिटॅमिन डी (Vitamin D) सहज उपलब्ध होते, परंतु शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन डीचा पुरवठा करणे थोडे कठीण आहे, ज्यामुळे शाकाहारी लोकांना अशक्तपणासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कोलेस्टेरॉलचे (Cholesterol) व्हिटॅमिन डीमध्ये रूपांतर करण्यासाठी सूर्यप्रकाश (Sunlight) हे एक उत्तम माध्यम बनते, परंतु केवळ सूर्यप्रकाश आणि शरीराचे कोलेस्टेरॉल पुरेसे नसते. आपल्याला इतर काही खाद्यपदार्थांची देखील आवश्यकता आहे. व्हिटॅमिन डीच्या काही चांगल्या शाकाहारी स्त्रोतांबद्दल जाणून घेवूयात (Vegan Vitamin D Sources)…

 

शाकाहारींसाठी सर्वोत्तम व्हिटॅमिन डी स्त्रोत

1. मशरूम (Mushroom)
मशरूम ही एकमेव अशी वनस्पती आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी-2 असते, तर अ‍ॅनिमल प्रॉडक्टमध्ये व्हिटॅमिन डी-3 असते. हे तितके प्रभावी नाही, परंतु तरीही शरीरातील व्हिटॅमिनचे प्रमाण भरून काढू शकते. (Vegan Vitamin D Sources)

 

2. फोर्टीफाईड दलिया (Daliya)
दलियामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात आढळते. दलिया्रच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये 0.2 ते 2.5 मायक्रोग्राम (8 ते 100 आययू) असतात. एका मायक्रोग्राममध्ये 40 आययू आढळते, जे व्हिटॅमिन डी मोजमापाचे एकक आहे. नियमित दलियाचे खाल्ल्याने व्हिटॅमिन डीची पुन्हा भरपाई होते.

 

3. फोर्टी फाईड संत्र्याचा ज्यूस (Orange juice)
संतत्रयाच्या ज्यूसमधून अनेक पोषक घटक मिळतात. या पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी आढळते. प्रत्येक सर्व्हिंगमध्ये 2.5 मायक्रोग्राम (100 आययू) पर्यंत व्हिटॅमिन डी असू शकते.

 

सामान्य शाकाहारी आहारात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळत नाही, परंतु खाद्यपदार्थ खरेदी करताना, त्यात फोर्टिफाइड व्हिटॅमिन डी आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांचे पॅकेजिंग तपासा. एका सामान्य व्यक्तीला दररोज 400 ते 800 आयू किंवा 10 ते 20 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vegan Vitamin D Sources | good vitamin d food sources for vegetarians

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Beard Hair Care Tips | तुमच्या दाढीचे सुद्धा केस गळतात का? या 5 सोप्या पद्धतीने थांबवा ‘बियर्ड हेयर फॉल’

 

Tender Coconut Cream | नारळपाणी प्यायल्यानंतर फेकू नका त्याची मलई, 5 फायदे जाणून घेतल्यास असे कधीही करणार नाही

 

Natural Ways to Reduce Headache | पेनकिलर्स घेण्यापेक्षा ‘या’ 7 घरगुती पद्धतीने बरी करा डोकेदुखी, झोप सुद्धा लागेल शांत