मुंबईत भाजी व्रिकेत्याला चाईर्ल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलिसांनी चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणाबद्दल एका भाजी विक्रेत्याला अटक केली असून हरिप्रसाद पटेल असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार साकीनाका येथील असून मुंबईतील हा अशा प्रकारचा पहिलाच सायबर गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन’(एनमॅक) ही संस्था चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे.

भारतामधून जी लोक अशा ध्वनिफिती आणि व्हिडियो वेबसाईटवर अपलोड करतात अशा व्यक्तींची माहिती देण्यासाठी या संस्थेशी केंद सरकारच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने करार केला असून, त्या करारानुसार चाईल्ड पोर्नोग्राफी अपलोड करणाऱ्या आरोपीची माहिती या संस्थेने मुंबई पोलिसांना दिली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून तो साकीनाका येथे भाजी विकायचा.

आरोपी पटेल ने गेल्या वर्षी फेसबुकवरती लहान मुलांचा अश्लील व्हिडियो अपलोड केला होता , त्यानंतर पोलिसांनी त्याचे अकाउंट बंद केले. आरोपीने मित्राच्या मोबाइलवरती दुसरे अकाऊंट ओपन करून लहान मुलांचा अश्लील व्हिडियो अपलोड केला आणि या प्रकरणी माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक केली.