Venkatesh Prasad | वेंकटेश प्रसाद म्हणाले, ‘हो कोहली स्वार्थी आहे…ट्विट व्हायरल, सर्वत्र चर्चा’

नवी दिल्ली : Venkatesh Prasad | विराट कोहली (Virat Kohli) हा फक्त स्वत:चात विचार करतो, विराट कोहली स्वार्थी आहे आणि मैलाचे दगड रचताना तो अजून कोणताही विचार करत नाही, अशा मजेशीर गोष्टी मला ऐकायला मिळत आहेत, असे ट्विट भारताचे माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी केले आहे, सध्या हे ट्विट व्हायरल होत असून त्यांना नक्की काय म्हणायचे आहे ते त्यांनी या ट्विटमध्ये पुढे स्पष्ट केले आहे.

कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात ४९ वे शतक साजरे केले. विराटने स्वार्थीपणे फलंदाजी केल्याने त्याला ४९ वे शतक झळकावता आले. कोहली हा रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाल्यावर मैदानात आला होता. पण त्याच्यापेक्षा चांगली खेळी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) साकारली. कोहली अखेरपर्यंत खेळपट्टीला चिटकून राहीला ते शतक झळकावण्यासाठी, अशी टीका त्याच्यावर होत आहे. यावर आता वेंकटेश प्रसाद यांनीही भाष्य केले आहे.

यावर प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी विराटला स्वार्थी म्हटले आहे पण तो का स्वार्थी आहे, हे आपल्या ट्विटमध्ये
स्पष्ट केले आहे. वेंकटेश प्रसाद यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, मला विचाराल तर कोहली हा स्वार्थी आहे…
अब्जावधी लोकांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तो स्वार्थी आहे. बऱ्याच गोष्टी साध्य केल्यावरही तो नेहमीच
उत्कृष्टतेचा ध्यास बाळगतो, यासाठी कोहली स्वार्थी आहे. तो नवीन नवीन मैलाचे दगड पार करत आहे आणि त्यासाठी
तो स्वार्थी आहे. संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तो स्वार्थी आहे. हो, कोहली हा स्वार्थी आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील कोहलीवर असे आरोप झाले आहेत. वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्याला स्वार्थी म्हटले गेले होते. मात्र, याबाबत चाहत्यांमध्ये वेगवेगळी मते आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal | CM शिंदेंनी स्पष्ट शब्दात भुजबळांना सुनावले, कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही, ‘सरकार…’

Pune Crime News | कार्ड इन्शूरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, हिंजवडीमधील प्रकार