नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरपीजी एन्टरप्रायजेस (RPG Enterprises) चे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका (Harsh Goenka) क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाजूने नाहीत आणि त्यांनी गुंतवणुकदारांना सुद्धा क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुक न करण्याचा सल्ला दिला आहे. हर्ष गोयंका यांनी एक व्हिडिओ ट्विट करून ती 5 कारणे सांगितली की ते कधीही भारतात बिटक्वाईन (Bitcoin) सारख्या क्रिप्टोकरन्सीजमध्ये गुंतवणूक का करणार नाहीत. हर्ष गोयंका (Harsh Goenka) म्हणतात की, क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत सतत होणारा चढ-उतार (Volatility) आणि रेग्युलेटरी कारणांसह इतरही अनेक कारणे आहेत, ज्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक टाळली पाहिजे.
त्यांनी म्हटले तरीही गुंतवणूक करायची असेल तर आपल्या पूर्ण पोर्टफोलियोच्या 5% पेक्षा जास्त भाग यामध्ये गुंतवू नका.
या कारणामुळे करू नये गुंतवणूक
1) हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी म्हटले इतर फायनान्शियल इंस्ट्रूमेंट किंवा करन्सीप्रमाणे क्रिप्टोकरन्सी कधीही असेटमधून आपली व्हॅल्यू derive करत नाही.
2) क्रिप्टोकरन्सीत खुप चढ-उतार आणि अस्थिरता आहे, सोबत त्याची किंमत कुणाच्या ट्विटने सुद्धा वर-खाली होते, त्यांचा इशारा एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे होता.
3) यास रेग्युलेट करणे खुप अवघड काम आहे आणि जगातील बहुतांश कंपन याचा स्वीकार करत नाहीत आणि करण्यास तयार नाहीत.
4) इतर करन्सीत जर काही नुकसान झाले तर त्याचा दावा किंवा तक्रार तुम्ही सरकारी अथॉरिटीकडे करू शकता, मात्र, जबाबदारी घेणारे कुणीही नाही.
5) भारतात आरबीआयने (India RBI) यास लीगल टेंडर म्हणजे वैध चलन मानन्यास नकार दिला आहे आणि यावर प्रतिबंध लावण्याची चर्चा सुरू आहे. यास बॅन करण्यासाठी सरकार कायदा सुद्धा आणत आहे.
Wab Title :- veteran industrialist harsh goenka reveals 5 reasons why he would never invest in cryptocurrencies in india kannd
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement